शोले या संपूर्ण चित्रपटात ठाकूरला हात नसल्याने त्याच्या अंगावर सतत शाल असल्याचे आपण पाहिले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, शोलेच्या एका दृश्यात प्रेक्षकांना संजीव कुमारचे हात पाहायला मिळाले होते. शोले हा चित्रपट जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एका दृश्यात ठाकूरचे हात आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. ही गोष्ट अनेक वर्षांनी काही प्रेक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी युट्युबला हे दृश्य अपलोड देखील केले आहे. या दृश्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या दृश्यावरून सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना ट्रोल देखील करण्यात आले होते.
शोले या चित्रपटात गब्बर म्हणजेच अमजद खान ज्यावेळी ठाकूरला बोलतो की, ये हाथ मुझे दे दे ठाकूर हा सीन प्रचंड गाजला होता. या सीनमध्ये संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हे दोघेही खूपच चांगले अभिनेते होते. या चित्रपटाच्या एका क्लायमॅक्सच्या दृश्यात ठाकूर गब्बरला लाथेने तुडवतो असे दिसले होते.. या दृश्यात ठाकूरचा हात प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
Also Read : ‘शोले’च्या शूटिंगवेळी चहा मिळाला नसल्याने गब्बर अमजद खानने सेटवर आणल्या होत्या चक्क दोन म्हशी!