Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनुष - क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती; वीकेंडला केली 'इतक्या' कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:20 IST

धनुष-क्रितीच्या बहुचर्चित 'तेरे इश्क में' सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. या सिनेमाने वीकेंडला केलेली कमाई वाचून थक्क व्हाल

सुपरस्टार धनुष आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक ड्रामा चित्रपट 'तेरे इश्क में' ने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाची सुरुवात धमाकेदार झाली आणि वीकेंडमध्ये या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ओपनिंग वीकेंड चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

'रांझणा' आणि 'अतरंगी रे' नंतर आनंद एल राय यांच्यासोबतची धनुषची ही तिसरी कलाकृती आहे. प्रेक्षकांनी सुरुवातीच्या तीन दिवसात चित्रपटाला सकारात्मक दिला आहे. या जोरावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा मोठा आकडा गाठला आहे.

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, 'तेरे इश्क में'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १६ कोटी रुपयांची कमाई केली होती, ज्यात हिंदीतून १५.२५ कोटी आणि तमिळमधून ७५ लाख रुपयांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने १७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले, ज्यात हिंदीतून १६.२५ कोटी आणि तमिळमधून ७५ लाख रुपये कमावले. सैकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने १८.७५ कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे, 'तेरे इश्क में' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत एकूण ५१.७५ कोटी रुपयांचे तगडे कलेक्शन केले आहे.

या बंपर कलेक्शनमुळे 'तेरे इश्क में' ने २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने तब्बल २९ चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंडचा रेकॉर्ड मोडला आहे. यामध्ये 'दे दे प्यार दे २' (३८.४३ कोटी रुपये), 'बाघी ४' (३७.१४ कोटी रुपये) आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (३२.१२ कोटी रुपये) यांसारख्या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. 'तेरे इश्क में' ला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanush-Kriti's 'Tere Ishq Mein' rocks box office with huge weekend collection.

Web Summary : Dhanush and Kriti Sanon's 'Tere Ishq Mein' had a strong box office opening, earning ₹51.75 crore in its first weekend. The film surpassed 29 other films' opening weekend records, becoming a major success.
टॅग्स :धनुषक्रिती सनॉनबॉलिवूडबॉक्स ऑफिस कलेक्शन