'पिंक'नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार तापसी पन्नू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 12:59 IST
चित्रपट पिंकनंतर तापसी पन्नू प्रकाशझोतात आली. पिंक चित्रपट तापसीच्या करिअरचा टर्निंग पोईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...
'पिंक'नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार तापसी पन्नू
चित्रपट पिंकनंतर तापसी पन्नू प्रकाशझोतात आली. पिंक चित्रपट तापसीच्या करिअरचा टर्निंग पोईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तापसीने आज बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तापसी पिंकनंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायला जातेय. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, एका क्राईम थ्रिलर चित्रपटात तापसी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांना कास्ट करण्यात आले आहे. अमिताभ यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे मात्र त्यांनी अजून चित्रपट साईन केलेला नाही. तर तापसीने चित्रपटासाठी कमिटमेंट दिली आहे. ऐवढेच नाही तर या चित्रपटासाठी तिने तयारी देखील सुरु केली आहे. अमिताभ बच्चन नुकतेच आमिर खानसोबत 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चे शूटिंग जोधपूरला पूर्ण करुन परतले आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच ते ऋषी कपूर यांच्यासोबत 102 नॉट आउटमध्ये दिसणार आहे. चित्रपटात अमिताभ यांचे वय १०२ वर्ष दाखविण्यात येणार असून, त्यांना पृथ्वीवरील सर्वांत वयोवृद्ध वक्तीचा रेकॉर्ड तोडायचा असतो, तर ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त अभिनेते परेश रावल यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनयाबरोबर एक गाणेही गायिले आहे. अमिताभ-ऋषी यांची जोडी अखेरीस ‘अजुबा’ या चित्रपटात बघायवास मिळाली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे. पुढे हे मेकअप उतरवण्यासाठी १ तास लागायचा. त्यामुळे या चित्रपटातील वयोवृद्ध पिता-पुत्राची जोडी पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झालाय. यातील अमिताभ व ऋषीची केमिस्ट्री चांगलीच इंटरेस्टिंग आहे.ALSO READ : लग्नाच्या प्रश्नावरून संतापली तापसी पन्नू; दिले रोखठोक उत्तर!