Join us

​तापसी पन्नूसाठी नवे घर ठरले भाग्याचे; ‘जुडवा २’ या चित्रपटासह 3 चित्रपटांचा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 19:11 IST

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘पिंक’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी तापसी पन्नू आगामी नाम शबानामुळे चांगलीच चर्चेेत आहे. नाम ...

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘पिंक’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करणारी तापसी पन्नू आगामी नाम शबानामुळे चांगलीच चर्चेेत आहे. नाम शबानाचे शूटिंग सुरू असून, हा चित्रपट अक्षय कुमार स्टारर बेबीचा प्रिक्वल असल्याचे सांगण्यात येते. पिंकच्या यशामुळे आनंदी असलेल्या तापसीने नवे घर खरेदी केले आहे. हे नवे घर तिच्यासाठी भाग्याचे ठरले आहे असेच म्हणावे लागेल, कारण निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत तापसीने ‘जुडवा २’ या चित्रपटासह तीन चित्रपटांचा करार केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात करणाºया तापसीने बॉलिवूडमध्ये ‘बेबी’, ‘पिंक’ या सारख्या उत्कृष्ट चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यासोबतच ती ‘नाम शबाना’ यासह अनेक प्रोजेक्टवर काम करीत आहे. तापसीने मुंबईतील ओशिवारा, अंधेरी येथे दोन बेडरूम असलेला आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. हे नवे घर तिच्यासाठी भाग्याचे ठरले आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत तिने तीन चित्रपटांचा करार केला आहे.  डेव्हिड धवन व साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटात तापसी महत्त्वाची भूमिका करणार असून, यात ती वरुण धवन व जॅकलिन फर्नाडिझसोबत दिसेल. ‘जुडवा २’ सह साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शनच्या आगामी तीन चित्रपटात ती काम करणार आहे. ‘जुडवा २’साठी दिलेल्या आॅडिशनचा अभिनय पाहून साजिदने तापसी पन्नूसोबत तीन चित्रपटांचा करार केला आहे. हे सारे घडले तापसीच्या नव्या घरात शिफ्ट झाल्यावर यामुळे ती प्रचंड आनंदी आहे. सध्या तापसी आपल्या चित्रपटांच्या शूटिंगमधून वेळ काढून नव्या घरासाठी अ‍ॅसेसरीज विकत घेत आहे. विशेष म्हणजे या घराचे इंटेरिअर स्वत: तापसीने केले आहे.