Join us
Daily Top 2Weekly Top 5

मधूर भांडारकर यांनाही पडली ‘तैमूर’ची भुरळ! बातमी वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 11:50 IST

होय, काही दिवसांपूर्वीच तैमूर डॉल बाजारात आली. पण आता एक अशी खबर आहे, जी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

ठळक मुद्देकरिना व सैफने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले, त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. या नावावरून सैफिनाला प्रचंड ट्रोल केले गेले होते. पण जसा जसा तैमूर मोठा झाला, तशी तशी त्याची लोकप्रीयता वाढत गेली.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा लाडका तैमूर अली खान इंटरनेट दुनियेचा स्टार आहे.   तैमूरची बातमी नाही, त्याचे क्यूट फोटो नाहीत असा एकही दिवस जात नाही. त्याची ही लोकप्रीयता कॅश करण्यात कुणीही मागे नाही. होय, काही दिवसांपूर्वीच तैमूर डॉल बाजारात आली. पण आता एक अशी खबर आहे, जी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. होय, दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनाही तैमूरची भुरळ पडली आहे. होय, मुंबई मिररने दिलेले वृत्त खरे मानाल तर, मधूर यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी एक नाव रजिस्टर केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘तैमूर’. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. त्यामुळे येत्या दिवसांत आपल्या  करिना व सैफच्या लाडक्या मुलाच्या नावाचा चित्रपट पाहायला मळणार आहे. दोन वर्षांच्या तैमूरची ही मोठी उपलब्धी मानावी लागेल.

करिना व सैफने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले, त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. या नावावरून सैफिनाला प्रचंड ट्रोल केले गेले होते. पण जसा जसा तैमूर मोठा झाला, तशी तशी त्याची लोकप्रीयता वाढत गेली. इतकी की, बॉलिवूडचे बडे स्टारही त्याचे ‘दिवाने’ आहे.

रणवीर सिंगला तैमूरच्या पापाची भूमिका साकारायची आहे. अजय देवगणने त्याला बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रीय ‘खान’ घोषित केले आहे. तैमूरची आई करिना कपूर हिनेही आपला मुलगा सुपरस्टार असल्याचे म्हटले आहे.  खरे तर तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. 

टॅग्स :तैमुरकरिना कपूरसैफ अली खान मधुर भांडारकर