Join us
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये तैमूरसोबत खेळणारी ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या कोण आहे ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 17:38 IST

तैमूर सध्या लंडनमध्ये असून त्याला तिथे खेळण्यासाठी मैत्रिणदेखील भेटली आहे.

सैफ अली खान व करीना कपूर खान यांचा छोटा नवाब तैमूर अली खान खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर बऱ्याचदा तो चर्चेत असतो. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तैमूरचा खूप क्यूट फोटो समोर आला आहे. या फोटोत तैमूर आपल्या छोट्या मैत्रिणीसोबत खेळताना दिसतो आहे. 

खरेतर सैफ अली खान व करीना कपूर हे दोघेही सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. पालक कामात बिझी असल्यामुळे तैमूरला खेळण्यासाठी नवीन पार्टनर मिळाली आहे. या छोट्या पार्टनरचं नाव आहे कायनात. कायनात ही टीव्ही होस्ट रणविजय सिंघाची मुलगी आहे.

रणविजय सिंघा सध्या त्याची पत्नी प्रियंका व लिटिस प्रिन्सेस कायनात सोबत सुट्टी एन्जॉय करत आहेत. रणविजय सिंघा आणि प्रियंकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तैमूर व कायनात यांचे क्युट फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोत तैमूर व कायनात एकत्र खेळताना दिसत आहेत.

फोटो पाहिल्यावर जाणवतंय की तैमूर व कायनात खूप चांगले फ्रेंण्डस आहेत. तैमूरने सी ग्रीन रंगाचा टीशर्ट व शॉर्ट्स परिधान केली आहे. या गेटअपमध्ये तो खूप क्यूट वाटतो आहे. तर कायनातदेखील व्हाईट प्रिंटेड ड्रेसमध्ये लिटिल एंजेलसारखी दिसते आहे.

तैमूर व कायनात यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

टॅग्स :तैमुरकरिना कपूरसैफ अली खान