Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup : पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूडमध्ये जल्लोष, टीम इंडियाचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:23 IST

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर बॉलिवूड स्टार्स काय म्हणाले?

T20 World Cup India Vs Pakistan : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुचर्चित सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करून दाखवत पाकिस्तान विरुद्धचा आपला दबदबा कायम राखला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज लढतीत भारतीय संघाने ६१ धावांनी मोठ्या विजयासह  सुपर ८ मध्ये प्रवेश केला. मैदानावरील या विजयाचे पडसाद बॉलिवूडमध्येही उमटले असून अजय देवगण, अर्जुन रामपाल आणि अनुपम खेर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय संघाच्या जबरदस्त कामगिरीने भारावलेल्या अजय देवगणने इन्स्टाग्रामवर खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, "या अद्भुत संघाने विजय खूप सोपा केला आहे. काय खेळ झाला".

भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये इशान किशनने अवघ्या ४० चेंडूत ७७ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.  यावर विवेक ओबेरॉयने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, "इशान किशनची ७७ धावांची तुफानी खेळी आणि बुमराह-हार्दिकची धारदार गोलंदाजी पाहून मी आनंदाने इतका ओरडलो की अजूनही माझे कान माझ्याच आवाजाने घुमत आहेत. आपल्या 'बॉईज इन ब्लू'ला अधिक ताकद मिळो", अशा शब्दांत विवेकने आनंद व्यक्त केला.

अभिनेता रितेश देशमुखनेही टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "जय जय जय जय हे". 

अभिनेता अर्जुन रामपालने सुपर ८ मधील प्रवेशाबद्दल संघाचं अभिनंदन केले. त्याने लिहिले, "शाब्बास! किती शानदार कामगिरी. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि इशान किशनला खास शुभेच्छा".

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सामन्यातील एक खास क्लिप शेअर करत "हर हर महादेव, जय भोलेनाथ" म्हणत हा विजय साजरा केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood Celebrates India's T20 World Cup Victory Over Pakistan

Web Summary : Bollywood erupted in celebration as India defeated Pakistan in the T20 World Cup. Ajay Devgn and other stars praised Team India's dominant performance, especially Ishan Kishan's batting and Bumrah's bowling. India secured a Super 8 spot with the win.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६इशान किशनअजय देवगणरितेश देशमुख