सैयामी सर्व मर्यादा लांघण्यास तयार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 19:55 IST
शबाना आझमी आणि तन्वी आझमीची नातेवाईक असलेली सैयामी खेर लवकरच ‘मिर्झिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या पहिल्या बॉलिवूड डेब्यूमध्ये ...
सैयामी सर्व मर्यादा लांघण्यास तयार!!
शबाना आझमी आणि तन्वी आझमीची नातेवाईक असलेली सैयामी खेर लवकरच ‘मिर्झिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या पहिल्या बॉलिवूड डेब्यूमध्ये सैयामी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.‘मिर्झिया’ ही मिर्झा साहिबा या प्रख्यात प्रेमी युगुलावर आधारित कथा आहे. एकीकडे सैयामी या चित्रपटात साहिबा बनून मिर्झांच्या प्रेमात स्वत: समर्पित करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे आजच्या युगातील मॉर्डन साहिबा बनून पडद्यावर बोल्ड लव्ह स्टोरी साकारणार आहे. अनेक कसोट्या पार कडून सैयामीची या भूमिकेसाठी निवड झाली. ‘मिर्झिया’मध्ये सैयामीने अनेक इंटिमेंट, किसींग व बिकिनी सीन्स दिले आहेत. याबद्दल विचारल्यावर सैयामीने अतिशय बिनधास्त उत्तर दिले. चित्रपटाच्या स्क्रीप्टची मागणी असेल तर मला इंटिमेंट, किसींग सीन्स देण्यात काहीही हरकत नाही. मी इथे काम करण्यासाठी आले असेल तर मग संकोच कसला. चित्रपटात बिकिनी सीन्स असेल तर ते द्यायलाही मी तयार असायला हवे. मी एक कलाकार आहे आणि कलाकार या नात्याने स्वत:ला कुठल्याही बंधनात बांधणे योग्य नाही, हे मी जाणते, असे सैयामी म्हणाली.