Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अ सुटेबल बॉय'चा विरोध करणाऱ्यांना स्वरा भास्करकडून चपराक, म्हणाली - 'तेव्हा रक्त नाही खवळलं?'

By अमित इंगोले | Updated: November 26, 2020 09:53 IST

'अ सुटेबल बॉय' मध्ये मध्य प्रदेशातील एका मंदिरात किसिंग सीन शूट करण्यात आला. याला अनेकांनी विरोध सुरू केला आहे.

जगप्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांची मिनी सीरीज 'अ सुटेबल बॉय' काही महिन्यांपूर्वी बीबीसीवर दाखवली गेली होती. आता गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. ही सीरीज वादात सापडली असून भाजपा नेत्याने यावर एफआयआर दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, ईशान खट्टर आणि तबूने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने या सीरीजला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद करणारा प्रश्न विचारला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत लिहिले की, जर ८ वर्षाच्या मुलीचा खरा गॅंगरेप जो एका मंदिरात झाला होता. त्याने तुमचं रक्त खवळलं नाही तर तुम्हाला मंदिरात खोट्या पद्धतीने किसचा सीन दाखवल्याने त्रास करून घेण्याचा काहीच अधिकार नाहीये. 

'अ सुटेबल बॉय' मध्ये मध्य प्रदेशातील एका मंदिरात किसिंग सीन शूट करण्यात आला. याला अनेकांनी विरोध सुरू केला आहे. सोशल मीडियावरून ही सीरीज बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. यावरून चांगलंच वादळ उठलं आहे. पण ही सीरीज अनेकांना आवडली असून ते याचा सपोर्ट करत आहेत.

भाजपा नेत्यांनी ट्विट करत यावर आक्षेप घेतला होता की, एका एपिसोमध्ये मंदिराच्या आवारात ३ वेळा किसिंग सीन आहे. एका हिंदू महिलेचं एका मुस्लिम मुलावर प्रेम आहे. पण किसचा सीन मंदिरातच का? याबाबत त्यांनी मध्यप्रदेशच्या रीवामध्ये एफआयआर दाखल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्सच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात केस दाखल केली होती. अनेकजण या सीरीजवरून लव्ह-जिहादचा मुद्दा उखरून काढत आहेत. 

टॅग्स :स्वरा भास्करवेबसीरिज