Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्रीला आपण ओळखले का? विना मेकअप लूक झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:46 IST

विनामेकअप लूक असला तरी स्वराचे सौंदर्य अधिक खुलल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच डेनिम जॅकेटमध्ये स्वराचा स्पोर्टी लूक पाहायला मिळत आहे.

चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. 'वीरे दी वेडिंग', 'नील बटे सन्नाटा', 'रांझणा' अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वरा भास्करचा एका फोटो समोर आला आहे. स्वराने या फोटो जराही मेकअप केलेला नाही. तसेच विनामेकअप लूक असला तरी स्वराचे सौंदर्य अधिक खुलल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच डेनिम जॅकेटमध्ये स्वराचा स्पोर्टी लूक पाहायला मिळत आहे.

स्वरा एका मेडीकल शॉपमध्ये गेली असताना हा फोटो मीडियाच्या कॅमे-यात कैद झाला आहे. हा फोटो पाहून काहींनी  तिला ओळखलेही नाही.मात्र ज्यांनी ज्यांनी स्वराला या फोटोत ओळखले. त्यांनी तिचे कौतुकच केले आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन लूक प्रमाणेच स्वराचा हा ऑफस्क्रीन लूकही तिच्या चाहत्यांच्या पसंती उतरला आहे. 

काही दिवसांपूर्वीच अभिनयाव्यतिरिक्त स्वराने निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 'गेल्या दीड वर्षांपासून कहानीवालेवर आमचे काम सुरु होते. वेगळ्या, नवीन आणि प्रभावी कथा मांडण्यासाठी ज्या चांगल्या लेखकांना आणि फिल्ममेकर्स योग्य ते व्यासपीठ मिळत नाही त्यांना पाठिंबा देणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे' असे स्वरा सांगते.

मध्यंतरी स्वरा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मासह झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती.  गेल्या ५ वर्षांपासून स्वरा भास्कर आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा हे नात्यांत होते. स्वरा हिमांशुकडे वारंवार ‘आपण लग्न करूयात’ या मुद्यावरून बोलत असे. पण, हिमांशुच्या डोक्यात स्वरासोबत लग्न करण्याचा विषयच नव्हता. त्यामुळेच स्वराने या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आणि मग त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :स्वरा भास्कर