Join us
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त ट्विटनंतर स्वरा भास्कर ट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:19 IST

या ट्विटसोबत तिने ‘फॅक्ट’ आणि ‘हिस्ट्री’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. स्वराच्या या ट्विटवर नेटकरी संतापले असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वराने तिच्या ट्विटमध्ये एक लेख शेअर केला आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायम नेटिझन्सच्या टिकेची धनी होत असते. तिने नुकताच आणखी वाद ओढवून घेतला आहे. ‘मुघलांनीच भारताला श्रीमंत केले,’ असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटसोबत तिने ‘फॅक्ट’ आणि ‘हिस्ट्री’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. स्वराच्या या ट्विटवर नेटकरी संतापले असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वराने तिच्या ट्विटमध्ये एक लेख शेअर केला आहे.

 या लेखात लेखकाने म्हटलं आहे की, ‘मुघल भारतात राज्य करण्याच्या हेतूने आले खरे पण त्यांच्यामुळे भारतातील जीवनमान बदलण्यास सुरुवात झाली. मुघलांनी भारतातील व्यापाराला चालना दिली. रस्त्यांची कामे केली. समुद्री मार्ग, बंदरे स्थापन करण्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली.’ हा लेख शेअर करत स्वरा भास्करने मुघलांनीच भारताला श्रीमंत केले असं म्हटलं आहे. तिच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यां नी तिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

स्वराच्या या ट्विटनंतर, मुघलांनी कशाप्रकारे भारताला लुटलं याचं उदाहरण देत अनेकांनी तिला समजावण्यासाठी ट्विट केले आहे. इतकंच नव्हे तर ट्विटरवर ‘मुघल्स’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.

टॅग्स :स्वरा भास्करट्रोल