Join us
Daily Top 2Weekly Top 5

नो मेकअप लूकमध्ये पुन्हा एकदा दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:04 IST

या अभिनेत्रीच्या विना मेकअप फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आणि आजही तिच्या भूमिकेबद्दल बोलले जाते. स्वरा भास्कर बऱ्याचदा रोखठोक भूमिकेमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नो मेकअप लूकमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

स्वराने स्वतःच विना मेकअप लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

यापूर्वीदेखील स्वराचा विना मेकअप लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी ती एका मेडीकल शॉपमध्ये गेली असताना हा फोटो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा फोटो पाहून काहींनी तिला ओळखलेही नव्हते. 

काही दिवसांपूर्वीच अभिनयाव्यतिरिक्त स्वराने निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 'गेल्या दीड वर्षांपासून कहानीवालेवर आमचे काम सुरु होते. वेगळ्या, नवीन आणि प्रभावी कथा मांडण्यासाठी ज्या चांगल्या लेखकांना आणि फिल्ममेकर्स योग्य ते व्यासपीठ मिळत नाही त्यांना पाठिंबा देणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे' असे स्वरा सांगते.

मध्यंतरी स्वरा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मासह झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. गेल्या ५ वर्षांपासून स्वरा भास्कर आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा हे नात्यांत होते. स्वरा हिमांशुकडे वारंवार ‘आपण लग्न करूयात’ या मुद्यावरून बोलत असे. पण, हिमांशुच्या डोक्यात स्वरासोबत लग्न करण्याचा विषयच नव्हता. त्यामुळेच स्वराने या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आणि मग त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :स्वरा भास्कर