Join us

​ स्वरा भास्कर म्हणते, मी जोखिम पत्करायला घाबरत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 11:07 IST

‘तनु वेड्स मनु’मध्ये नायिकेचा सर्वांत जवळच्या मैत्रिणीपासून ‘नील बटे सन्नाटा’मध्ये १५ वर्षांच्या मुलीची आई बनण्यापर्यंतच्या अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका ...

‘तनु वेड्स मनु’मध्ये नायिकेचा सर्वांत जवळच्या मैत्रिणीपासून ‘नील बटे सन्नाटा’मध्ये १५ वर्षांच्या मुलीची आई बनण्यापर्यंतच्या अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वरा भास्करने साकारल्या. स्वराने आजपर्यंत साकारलेल्या सर्वच्या सर्वचं भूमिका केवळ विविधांगी नव्हत्या तर जोखिम भरलेल्या होत्या. पण   करिअरच्या सुरूवातीपासूनचं स्वराने जोखिम पत्करली. याचे कारण म्हणजे, जोखिम पत्करायला स्वरा जराही घाबरत नाही. एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोलली.मी कधीच जोखिम पत्करायला घाबरले नाही. मी चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा येथे स्वत:साठी कसा मार्ग तयार करायचा, हे मला माहित नव्हते. हे करू नकोस, त्या भूमिका करू नकोस, असे लोकांनी मला भरपूर सल्ले दिलेत.   बहीण वा मैत्रिणीच्या भूमिका अजिबात स्वीकारू नकोस, असेही मला सांगण्यात आले. खलनायिका वा आईची भूमिका न स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला. पण मी हे सगळे सल्ले धुडकावून लावले. एकाअर्थी मी लोकांचे सल्ले न मानून केवळ माझ्या मनाला पटेल तेच केले. मुख्य भूमिका मिळवण्यासाठी लोकांनी हे नियम बनवले आहेत ना. एकदा हे तोडूनचं बघू, हे मी ठरवले आणि हे नियम तोडायचे तर जोखिम घेण्यास शिकले. अपयशाला घाबरायचे नाही आणि जोखित पत्करायला मागे हटायचे नाही, हे दोन नियम मी स्वत:ला घालून दिले़, असे स्वरा म्हणाली.स्वराने ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात दिलेल्या एका बोल्ड सीनमुळे वाद उफाळला. पण स्वरासाठी हा वाद निव्वळ निरर्थक आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये तो सीन साकारणे ही सुद्धा माझ्यासाठी जोखिम होती. याहीवेळी मी ती पत्करली, असे स्वरा म्हणाली.ALSO READ : या ड्रेसवरून ट्रोल होतेय स्वरा भास्कर; यूजर्सनी म्हटले ‘वॉशिंग पावडर निरमा’!बोल्ड कंटेन्ट असलेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट अलीकडे रिलीज झाला. अनेकांना तो आवडला. अर्थात हा चित्रपट पाहून अनेकांनी नाकेही मुरडली. अनेकांना यातील बोल्डनेस आवडला नाही़ विशेषत: यात स्वराने दिलेला सीन पाहून अनेकांनी तिला धारेवर धरले.