Join us  

बॉयफ्रेन्डच्या पोस्टवर सुश्मिताची ‘रोमॅन्टिक’ कमेंट, ब्रेकअपची चर्चा करणार्‍यांची झाली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 1:27 PM

रोहमनने एक पोस्ट केली आणि यानंतर या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. अर्थात यानंतर लगेच सुश्मिताने रोहमनच्या या पोस्टवर कमेंट करत सगळे काही ऑल वेल असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुळचा काश्मीरचा असलेला रोहमन नैनीतालमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. तो सुश्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.

सुश्मिता सेन व रोहमन शॉल हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहे. सोशल मीडियावर दोघांचे रोमॅन्टिक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण गेल्या काही दिवसांपासून या कपलच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. रोहमनने एक पोस्ट केली आणि यानंतर या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. अर्थात यानंतर लगेच सुश्मिताने रोहमनच्या या पोस्टवर ‘उफ्फ जान’ अशी कमेंट करत सगळे काही ऑल वेल असल्याचे स्पष्ट केले.

रोहमनची पोस्ट

रोहमनने एका झाडाचा फोटो पोस्ट करत, सोबत एक मार्मिक कॅप्शन शेअर केले होते. ‘ उस वक्त, उस जगह, जहां मुझे लगा मैं अकेला हूं, वहां मुझे इस पेड़ का साथ मिला! इसे अब मैंने कैद कर लिया है और अकेले पन से रिश्ता गैर कर लिया है.- आरएस’, अशी पोस्ट रोहमनने केली. त्याची ही पोस्ट वाचून सुश्मिता व रोमहनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्यात. मात्र सुश्मिताने लगेच रोहमनच्या या पोस्टवर कमेंट केली. ‘उफ्फ जान... बात तो है,’ असे कमेंटमध्ये तिने लिहिले. तिची ही कमेंट पाहून रोहमन व तिच्यात सगळे काही आॅलवेल असल्याचे स्पष्ट झाले.

मुळचा काश्मीरचा असलेला रोहमन नैनीतालमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. तो सुश्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. वयातील फरकामुळे सुश व रोहमन ही जोडी सतत चर्चेत असते. ट्रोलही होते. मात्र रोहमन व सुश्मिता बिनधास्तपणे आपले रिलेशनशिप एन्जॉय करताना दिसतात. त्यांच्या सोशल अकाऊंटवरही याची झलक पाहायला मिळते.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल