Join us

'जगा आणि जगू द्या'; ट्रोलिंगला वैतागलेल्या ललित मोदींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 13:04 IST

Lalit Modi: ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून सोशल मीडियावर ललित मोदी आणि सुश्मिता यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या प्रकरणी या दोघांना ट्रोलही केलं आहे.

 इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) माजी चेअरमन ललित मोदी ( Lalit Modi) यांनी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुश्मिता सेनला (sushmita sen)  डेट करत असल्याची जाहीरपणे कबुली दिली. ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. विशेष म्हणजे तेव्हापासून सोशल मीडियावर ललित मोदी आणि सुश्मिता यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या प्रकरणी या दोघांना ट्रोलही केलं आहे. त्यावर आता ललित मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सुनावलं आहे.

ललित मोदी यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर सुश्मिता सेनसोबतचे अनेक अनसीन फोटो शेअर केले. मात्र, हे फोटो शेअर करत असताना त्यांनी सुश्मिताच्या चुकीच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. इतकंच नाही तर ट्रोलर्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलं. याप्रकरणी संतापलेल्या  ललित मोदींनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

ललित मोदीला डेट करणाऱ्या सुश्मितामुळे 'या' दिग्दर्शकाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न; विवाहबाह्य संबंध पडले होते महागात

काय म्हणाले ललित मोदी?

"मी कोणत्याही चुकीच्या अकाऊंटला टॅग केलेलं नाही. सुश्मिताचं ते खरं अकाऊंट आहे. त्यामुळे यात ट्रोल करण्यासारखं काही नाही. मला एक कळत नाहीये मला ट्रोल करण्यासाठी लोकांमध्ये एवढी उत्सुकता का आहे? मला असं वाटतंय आपण आजही जुन्याच काळात जगतोय, जिथे दोन व्यक्ती चांगले मित्र होऊ शकत नाहीत. माझा सगळ्यांना एक सल्ला आहे जगा आणि जगू द्या," असं ललित मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "माझी पहिली पत्नी मीनल आणि मी आमच्यात जवळपास १२ वर्षांची मैत्री होती. आणि, ती माझ्या आईची मैत्रीण नव्हती. लोकांनी उगाचच चर्चेला काही तरी विषय मिळावा म्हणून ही अफवा पसरवली. इतरांच्या आनंदात आनंद शोधायला शिका. मला सगळे पळकुटा म्हणतात, जरा मला सांगा कोणत्या न्यायालयाने मला दोशी ठरवलं आहे?"

दरम्यान, ललित मोदींची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. १४ जुलै रोजी ललित यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी सुश्मिताला त्यांचा बेटरहाफ असल्याचं म्हटलं. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :ललित मोदीसुश्मिता सेनसेलिब्रिटीबॉलिवूड