सुश्मिताच्या या डान्सचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून, सोशल मीडियावर तो शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुश्मिताने लिहिले की, ‘सेंट अॅड्र्यूस कॉलेजमध्ये मी माझ्या गाण्यावर...’ यावेळी सुश्मिताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये विद्यार्थी स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा डान्स सुश्मिता खूपच एन्जॉय करीत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून सुश्मिता मोठ्या पडद्यावरून गायब आहे. चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा असल्याचे सुश्मिताने वेळोवेळी सांगितले आहे. मात्र सुश्मिता पडद्यावरून जरी गायब असली तरी तिच्या लव्ह लाइफमुळे ती नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, सुश्मिताचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर लगेचच अशी बातमी आली की, या दोघांचे पुन्हा पॅचअप झाले आहे.