Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय ? रिया चक्रवर्ती करायची जादूटोणा, सुशांतच्या बहिणीला नोकराने दिली होती माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 14:15 IST

सुशांतच्या बहिणीने केला मोठा खुलासा

ठळक मुद्देसुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे  हिने देखील बिहार पोलिसांसमोर काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अडचणीत आलेली त्याची कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीबद्दल सुशांतच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे. होय, रिया ब्लॅक मॅजिक करायची, असे तिने म्हटलेय. बुधवारी सुशांत सिंग राजपूतची बहिण मितू सिंह हिची पाटणा पोलिसांनी जवळपास 4 तास चौकशी केली. यादरम्यान मितूने ही आश्चर्यकारक बाब सांगितली.

सुशांतच्या  फ्लॅटवर रिया चक्रवर्ती ब्लॅक मॅजिक करत असे. सुशांतच्या घरी कम करणा-या नोकरानेच मला ही माहिती दिली होती. हा नोकर सुशांतच्या फ्लॅटच्या जवळच राहतो. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यावेळीही तो हजर होता, असे मितूने सांगितल्याचे कळते. सुशांत आणि रियामध्ये सुशांतच्या आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी भांडण देखील झाले होते, असेही मितूने सांगितल्याचे कळते.

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतला पूर्णपणे कंट्रोल केले होते. मीडियासमोर सुशांतल मानसिक रूग्ण ठरवण्याची धमकी ती देत होती, असे अनेक आरोप करत सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे  हिने देखील बिहार पोलिसांसमोर काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले की सुशांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता आणि ही गोष्ट स्वत: सुशांतने  अंकिताला सांगितली होती. अंकिताने सुशांतसोबत झालेले चॅटही पोलिसांना सुपूर्द केले आहे. रियाला सुशांतने अंकितासोबत संपर्कात राहणे आवडत नव्हत. ब्रेकअपनंतरही अंकिता सुशांतच्या संपर्कात होती. मात्र ही गोष्टी रियाला आवडत नव्हती, असेही अंकिताने पोलिसांना सांगितली. 

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत