Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत स्वतःसाठी नाही तर रियाला काम मिळवून देण्यासाठी करत होता धडपड, आता ही माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:34 IST

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होता आणि ते नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होता आणि ते नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले होते. आता अशी माहिती समोर येते आहे की, सडक चित्रपटाच्या रिमेकमध्ये रियाला घेण्यासाठी तो महेश भट यांच्याशी बोलला होता. आलिया भटच्या आधी सुशांतने रियाचे नाव महेश भट यांना सुचविले होते. असेही सांगितले जात आहे की आधी या सिनेमासाठी सुशांतला विचारण्यात आले होते. त्यानंतर या सिनेमासाठी आदित्य रॉय कपूरला विचारण्यात आले होते.

सुशांत सिंग राजपूतला सडक 2मध्ये त्याच्यासोबत रियाला मुख्य भूमिकेत घ्यायचे होते आणि त्याने याबाबत महेश भट यांना सांगितले होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की आलिया भट सडक 2 साइन करण्याआधीची ही गोष्ट आहे. आलियाला तेव्हा माहितही नव्हते की सडक 2साठी तिच्याकडे तारखा उपलब्ध आहेत की नाहीत. तसेच महेश भट यांनी सुशांतला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी विचारले होते. पण, ही भूमिका आदित्य रॉय कपूरला मिळाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतने स्वतःसोबत रियाला चित्रपटात घेण्याबाबत महेश भट यांच्यासोबत बातचीत केली होती. पण, ते शक्य झाले नाही. मात्र सुशांतने त्याचा मित्र रुमी जाफरीला रिया व सुशांतला एका सिनेमात घेण्यासाठी तयार केले.

सुशांत रियाला काम मिळवून देण्यासाठी खूप मेहनत करत होता. पण, सुशांतने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती