Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूत ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला,‘SWEETHEART’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:36 IST

‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे बॉलिवूडच्या प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत. ‘बी टाऊन’च्या सर्व तारे-तारकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक ...

‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे बॉलिवूडच्या प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत. ‘बी टाऊन’च्या सर्व तारे-तारकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. अलीकडेच त्याने त्याचा ३१ वा बर्थडे त्याच्या क्लोज फ्रेंड्ससोबत सेलिब्रेट केला. या पार्टीत त्याचे जवळचे मित्रमैत्रीणी तर होतेच पण एक ‘खास’ व्यक्तीही आली होती. कोण होती ही स्पेशल व्यक्ती? तुम्हाला वाटेल त्याची ‘एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे. पण, नाही. अंकिता नव्हे तर त्याच्या आगामी ‘राब्ता’ चित्रपटातील अभिनेत्री क्रिती सॅनन या पार्टीत उपस्थित झालेली होती.                             ALSO READ : BIRTHDAY BASH : सुशांत सिंग राजपूतच्या बर्थडे पार्टीचे ‘INSIDE PICS’‘दिलवाले’ फेम क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यातील प्रेमप्रकरण सध्या खुप गाजतेय. ‘राब्ता’ मुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात प्रेम बहरू लागल्याचे सुत्रांकडून कळतेय. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतने ‘राब्ता’ची शूटिंग करायला सुरूवात केली होती. शूटिंगच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सुशांत-क्रिती यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाचे काही क्षण आले. त्यामुळे नुकतेच झालेल्या सुशांतच्या बर्थडे पार्टीत क्रिती आवर्जून आली होती. मात्र, पार्टीत येण्याअगोदर तिने सुशांतला टिवटरवर विश केले होते. ‘हॅप्पी बर्थडे सुश. आपकी मुस्कान हमेशा बनी रहे. आपक सपने पूरे हो. खुशिया, प्यार और आईस्क्रीम??’ त्यावर सुशांतने रिप्लाय दिला की,‘आईस्क्रीम, अच्छा...थँक्स अ लॉट ‘स्वीटहार्ट.’                                           एक्स- गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यासोबत सुशांतसिंग राजपूत बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, अंकितासोबतचे ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत एकटा पडला होता. ‘राब्ता’च्या निमित्तानं त्याच्या आयुष्यात आलेली क्रिती आता त्याची गर्लफ्रेंड बनलीय. मात्र, सुशांतने अद्याप अधिकृतरित्या काहीही घोषित केलेले नाहीये. ALSO READ : ‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी