Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या पैशाने रिया चक्रवर्तीचा युरोप टूर अन् बरेच काही! समोर आलेत बँक डिटेल्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 15:46 IST

11 महिन्यांच्या या डिटेल्सनुसार, सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या क्रेडिट कार्डवर बराच खर्च केला होता.

ठळक मुद्दे14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  

अभिनेता सुशांत सिंग मृत्यूप्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत 3 डझनावर लोकांची चौकशी केलीये. आता या प्रकरणासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. होय, पोलिसांना सुशांतचे बँक डिटेल्स मिळाले आहेत. 11 महिन्यांच्या या डिटेल्सनुसार, सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या क्रेडिट कार्डवर बराच खर्च केला होता.न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बँक डिटेल्सनुसार   रिया चक्रवर्तीने सुशांतच्या क्रेडिट कार्डवरून बरेच शॉपिंग केले होते. सुशांतच्या क्रेडिट, डेबिट कार्डवरून तिने शॉपिंग केले आहे. एवढेच नव्हे तर गेल्यावर्षीच्या युरोप टूरचा खर्च देखील सुशांतच्या बँक अकाउंटमधूनच झाला होता. हे बँक डिटेल्स  पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रिया चक्रवर्तीची चौकशी केली होती. या चौकशीत रियाने अनेक खुलासे केले होते. रिया ही सुशांतसोबत त्याच्या घरात राहत होती. मात्र सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी ती तिच्या मैत्रिणीकडे शिफ्ट झाली होती. 

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया प्रचंड चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले जातेय. इतकेच नाही तर तिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्याही मिळत आहेत. रियाने स्वत: या धमक्यांचे स्क्रिनशॉट्स शेअर केले होते.   गुरुवारी तिने सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली होती, त्यानंतर देखील रियाला ट्रोल करण्यात आले होते.  14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती