Join us  

Justice For Sushant Singh Rajput... परदेशातही लागलं होर्डिंग, बहिणीने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 11:33 AM

सुशांतच्या मृत्यूवरून पडदा उठावा अशी केवळ भारतातीलच नाही तर त्याच्या जगभरातील फॅन्सची इच्छा आहे. सुशांतची बहीण श्वेताने कॅलिफोर्नियातील एका होर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर Justice For Sushant Singh Rajput... असं लिहिलंय. 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं गुपित उलगडलं जावं यासाठी देशात काही आंदोलने केली गेली. सोशल मीडियातूनही यावर त्याचे फॅन्स आणि काही कलाकार आवाज उठवत आहेत. पण सुशांतच्या मृत्यूवरून पडदा उठावा अशी केवळ भारतातीलच नाही तर त्याच्या जगभरातील फॅन्सची इच्छा आहे. सुशांतची बहीण श्वेताने कॅलिफोर्नियातील एका होर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर Justice For Sushant Singh Rajput... असं लिहिलंय. 

कॅलिफोर्नियातील या होर्डिंगवरून हे लक्षात येतं की, सुशांतचे फॅन्स केवळ भारतातच नव्हते तर जगभरात होते. आणि हेच कारण आहे की, कॅलिफोर्नियातील त्याचे फॅन्सही न्यायाची मागणी करत आहेत. श्वेताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'ही वर्ल्डवाइड मुव्हमेंट आहे'.तसेच आणखी एक व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, 'सुशांत तू आमच्या हृदयात धडधडत आहे'.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची केस दिवसेंदिवस किचकट होत चालली आहे. आधी मुंबई पोलीस याचा तपास करत होती. पण नंतर ही केस बिहार पोलिसांकडेही गेली होती. मात्र, आता मागणी केल्यानुसार या केसचा तपास सीबीआय करणार आहे.  त्यामुळे आता सुशांतच्या मृत्यूचं गूढ लवकरच समोर येईल अशी आशा केली जात आहे.

तसेच सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी ईडी काल बोलवलं होतं. तिला बरेच प्रश्न विचारण्यात आले. तसेच रियाने यावेळी सांगितले की, तिने सुशांतकडून पैसे घेतले नाहीत. याप्रकरणी रियाला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं.

हे पण वाचा :

अंकिता लोखंडे पुन्हा झाली भावूक, फोटो शेअर करत केली या व्यक्तीची आठवण ? सुशांतसह आहे खास कनेक्शन

खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने...

टॅलेंट मॅनेजरचा खुलासा, आत्महत्येच्या एक दिवस सुशांतशी या गोष्टी संदर्भात झाले होती चर्चा

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकॅलिफोर्नियाबॉलिवूड