Join us  

फक्त सुशांतच नाही तर रिया चक्रवर्तीही त्याच्यासोबत गांजा ओढायची, श्रुती मोदीचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 12:19 PM

सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीने चौकशी दरम्यान खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचे फोन चॅटसमोर आल्यानंतर सगळेजण हैराण झाले होते. कारण रियाच्या चॅटमधून तिचं ड्रग्ज कनेक्शन जगासमोर आला. रियाने आजतकला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की, सुशांत तिला भेटायच्या आधीपासून ड्रग्सचे सेवन करत होता. सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीने चौकशी दरम्यान खुलासा केला आहे की, सुशांतसोबत रियादेखील गांजा ओढायची.  

सुशांत - रिया टेरेसवर जाऊन स्मोक करायचे बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सीबीआयला दिलेल्या जबाबात श्रुतीने सांगितले की, रिया आणि सुशांत दोघेही गांजा एकत्र घेत असत. सुशांत आणि रिया बर्‍याचदा गांजा ओढण्यासाठी टेरेसवर जायचे. रिपोर्टनुसार रिया आपला भाऊ शौवित आणि सॅम्युअल मिरांडसोबत सुद्धा स्मोक करायची. श्रुती मोदी असेही म्हणाले की,  ड्रग्स सुशांतच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता आणि तो याच्या आधीन गेला होता. श्रुती म्हणाली की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्याचा कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. तिला या सर्व गोष्टींचा भाग बनण्यास जबरदस्ती केली जायची. 

रिया व सॅम्युअल मिरांडाच्या घरी धाड रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने धाड टाकली असून ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी म्हटले आहे, की टीमने ज्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्यासोबत रिया व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. यामुळे रिया व तिच्या भावालाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

तो 4 वेळा स्मोक करतो...! ड्रग्ज कनेक्शनबद्दल मोठा खुलासा, रिया चक्रवर्ती व शौविकचे चॅट आले समोर

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती