Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:07 IST

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचे होते आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचे होते आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याचा हाऊस हेल्पर नीरजने काही धक्कादायक विधानं केले आहे. एका मुलाखती दरम्यान नीरज म्हणाला, रिया चक्रवर्तीने घरात जादू टोण्याची पूजा केली होती. त्यावेळी कुक केशव तिथे उपस्थित होता. त्यानेच आम्हाला याबाबत सांगितले होते. नीरजच्या म्हणण्यानुसार सुशांतला काही आवाज ऐकू येत होते आणि त्यामुळे तो अस्वस्थ होतो. 

ज्या दिवशी अभिनेताने सकाळी स्वत: ला फाशी घेतली त्या दिवसाविषयी बोलताना नीरज म्हणाला की ,सिद्धार्थ पिठानीने त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला. जेव्हा आम्ही सर्वांनी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा तो बेडवरच्या खूपवर होता. सिद्धार्थ पिठानीला कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर त्याने बॉडी खाली उतरवली. तो फोन कोणाचा होतो हे आम्हाला नाही माहिती. 

रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, नीरज, सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत सगळे रिया चक्रवर्तीसोबत काम करायचे. .सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. त्यामुळे यात सीएही सहभागी असल्याचा संशय वर्तवण्यात आला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत