Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग रजपूत या अभिनेत्रीसोबत गेला होता हॉलिडेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 12:29 IST

सुशांत गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर खूपच कमी अ‍ॅक्टिव्ह होता. पण त्याने नुकतेच त्याचे लडाखमधील हॉलिडेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

ठळक मुद्देसुशांत लडाखला काही मित्रमैत्रिणींसोबत गेला होता. पण या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रियाचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे. कारण तिने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच लडाखचे फोटो पोस्ट केले आहेत. 

सुशांत सिंग रजपूरतने काय पो छे या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली. त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले होते आणि त्याच्या मालिकांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.  त्याने एम एस धोनी, केदारनाथ, सोनचिडिया अशा अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुशांतची बॉलिवूडमध्ये एंट्री झाल्यापासूनच त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याची देखील मीडियात नेहमीच चर्चा रंगली आहे. सुशांत पवित्र रिश्ता या मालिकेत काम करत असताना त्याची ओळख अंकिता लोखंडे सोबत झाली होती. ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते. पण त्यांनी काही वर्षांपूर्वी ब्रेकअप केले. 

सुशांत सिंग रजपूत आणि सारा अली खानचा केदारनाथ काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सारा अली खान आणि सुशांतच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. पण त्या दोघांनी यावर मौन राखणेच पंसत केले होते. काही महिन्यांपूर्वी सारा अली खानला त्याने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चांना ऊत आला. एवढेच नव्हे तर तिच्यासोबतचे सगळे फोटो त्याने डीलिट केले होते. त्यानंतर काहीच महिन्यांत त्याच्या आणि रिया चक्रवर्तीच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. पिंकव्हिनाने दिलेल्या बातमीनुसार, रिया आणि सुशांत एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याची चर्चा असली ते दोघे एकमेकांचे केवळ खूप चांगले मित्र असल्याचे कबूल करतात. 

सुशांत गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर खूपच कमी अ‍ॅक्टिव्ह होता. पण त्याने नुकतेच त्याचे लडाखमधील हॉलिडेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तो तिथे त्याच्या काही मित्रमैत्रिणींसोबत गेला होता. पण या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रियाचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे. कारण तिने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच लडाखचे फोटो पोस्ट केले आहेत. 

रिया आणि सुशांत एकमेकांचे केवळ फ्रेंड्स आहेत की दाल में कुछ काला है याविषयी केवळ ते दोघेच सांगू शकतात. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती