सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडचा एक उत्तम अभिनेता आहे. ‘एमएस धोनी’, ‘राबता’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि अलीकडे प्रदर्शित झालेला ‘सोनचिडिया’ अशा अनेक चित्रपटांतील सुशांतचा अभिनय प्रेक्षकांना भावला. लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केलेत. सुशांतने असे का केले, हे कळायला मार्ग नाही. साहजिकच त्याचे ७८ लाख फॉलोअर्स त्याच्या या कृतीमुळे धक्क्यात आहेत.
OMG! सुशांत सिंग राजपूतने डिलीट केल्या इन्स्टावरच्या सर्व पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:24 IST
लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केले आहेत.
OMG! सुशांत सिंग राजपूतने डिलीट केल्या इन्स्टावरच्या सर्व पोस्ट!
ठळक मुद्देसुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात संजना सांघी त्याच्या अपोझिट दिसणार आहे.