Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँकॉक ट्रिपवर केवळ आणि केवळ सारा अली खानसाठी सुशांतने बुक केले होते चार्टर्ड प्लेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:02 IST

गेल्या काही दिवसांत सुशांतची बँकॉक ट्रिपही चर्चेचा विषय बनली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीत अशा अनेक जुन्या गोष्टींचे खुलासे होतायेत ज्याबाबत खूप कमी लोकांना माहिती नव्हतं. सीबीआय सुशांतशी संबंधित असलेल्या अनेक लोकांची चौकशी करत आहे, परंतु यादरम्यान बऱ्याच नव्या गोष्टी समोर येतायेत. गेल्या काही दिवसांत सुशांतची बँकॉक ट्रिपही चर्चेचा विषय बनली आहे.

सुशांतचा स्टाफ असलेल्या साबिर अहमदने एक मुलाखती दरम्यान बँकॉक ट्रिपबाबत सांगितले. रियाने चक्रवर्तीने या ट्रिपमध्ये केवळ सुशांतचे मित्रच गेल्याचे सांगितले होते. साबिरने हा खुलासा केला की, या ट्रिपमध्ये फक्त सुशांतचे मित्रच नाही तर सारा अली खानसुद्धा होती.

फक्त सारासाठी सुशांतने बुक केले होते चार्टर्ड प्लेन या ट्रिपवर सुशांतने मित्रांसाठी 70 लाख खर्च केल्याची चर्चा आहे. सारासाठी सुशांतने ही ट्रिप ऑर्गनाइज केल्याची माहिती समोर येते आहे. या ट्रिपवर सात लोक होते सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल जावेरी, अब्बास, सुशांतचा बॉडी गार्ड मुस्ताक आणि स्वत: साबिर अमहद. या ट्रिपसाठी सुशांतने केवळ सारासाठी चार्टर्ड प्लेन बुक केले होते. कारण सुशांत आणि सारा रिलेशनशीपमध्ये आहेत हे कुणाला कळू नये. 

सारासोबत 3 दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होता सुशांत सुशांत व सारा दोघेही 3 दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होते, असा खुलासा सुशांतचा स्टाफ साबीर अहमदने याआधी केला होता.  2018 च्या डिसेंबर महिन्यात हे सगळे लोक बँकॉकच्या ट्रिपवर गेले होते. ट्रिपबाबत साबिर अहमदने सांगितले की, तो तीन दिवसांसाठी सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खानसोबत एका हॉटेलमध्ये होते.ट्रिपच्या पहिल्या दिवशी सगळेच बीचवर गेले होते. त्यानंतर सुशांतचे बाकीचे मित्र बँकॉक फिरत होते आणि सुशांत-सारा हॉटेलमधेच होते. सर्वच लोक बॅकॉकमधील आयलँड हॉटेलमध्ये थांबले होते. ही एक आलिशान ट्रिप होती. पण त्सुनामीमुळे ही ट्रिप अर्धवट सोडावी लागली होती. सर्वांना मुंबईला परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

माझ्यासोबतच असे का? म्हणत ढसाढसा रडला होता सुशांत 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसारा अली खान