माझ्यासोबतच असे का? म्हणत ढसाढसा रडला होता सुशांत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:21 PM2020-08-30T12:21:32+5:302020-08-30T12:22:47+5:30

 सारा अली खानसोबत ब्रेकअप झाल्यावर अशी झाली होती सुशांतची अवस्था

sushant singh rajput friend reveals how he wept like a child after his split from sara ali khan |  माझ्यासोबतच असे का? म्हणत ढसाढसा रडला होता सुशांत

 माझ्यासोबतच असे का? म्हणत ढसाढसा रडला होता सुशांत

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत व सारा दोघेही 3 दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होते, असा खुलासा सुशांतचा स्टाफ साबीर अहमदने याआधी केला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. रिया चक्रवर्ती हिच्याआधी सुशांत सारा अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता, हा असाच एक खुलासा. सुशांतचा पर्सनल असिस्टंट राहिलेल्या साबीर अहमदने अलीकडे हा खुलासा केला होता. आता सुशांतची एक फॅमिली फ्रेंड स्मिता पारीख हिनेही सुशांत व साराच्या रिलेशनशिपबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत स्मिता सुशांत व साराच्या रिलेशनशिपबद्दल बोलली. तिने सांगितले, सारा अली खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत प्रचंड दु:खी झाला होता. या ब्रेकअपनंतर तो आतून कोलमडला होता. तासन् तास तो नुसता रडत राहायचा. माझ्याच सोबत असे का होते? असे रडत रडत तो मला म्हणाला होता. ‘केदारनाथ’ या सिनेमात सारा व सुशांत यांनी एकत्र काम केले होते. यादरम्यान सुशांत सारात गुंतला होता. ‘केदारनाथ’च्या प्रमोशनवेळी तो खूप आनंदी होता.
स्मिताने दिलेल्या माहितीनुसार, सारासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतच्या आयुष्यात रिया चक्रवर्तीची एन्ट्री झाली होती.

सारासोबत 3 दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होता सुशांत
 सुशांत व सारा दोघेही 3 दिवस बँकॉकच्या हॉटेलमध्ये होते, असा खुलासा सुशांतचा स्टाफ साबीर अहमदने याआधी केला होता.
 सुशांतने त्याच्या पीआरओ टीममधील सदस्य आणि अभिनेत्री सारा अली खानसोबत एक ट्रिप होती. ज्यात सुशांतच्या स्टाफमधील दोन लोक होते.
2018 च्या डिसेंबर महिन्यात हे सगळे लोक बँकॉकच्या ट्रिपवर एका प्रायव्हेट जेटने गेले होते. ट्रिपबाबत साबिर अहमदने सांगितले की, तो तीन दिवसांसाठी सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खानसोबत एका हॉटेलमध्ये होते.ट्रिपच्या पहिल्या दिवशी सगळेच बीचवर गेले होते. त्यानंतर सुशांतचे बाकीचे मित्र बँकॉक फिरत होते आणि सुशांत-सारा हॉटेलमधेच होते.
सर्वच लोक बॅकॉकमधील आयलँड हॉटेलमध्ये थांबले होते. ही एक आलिशान ट्रिप होती. पण त्सुनामीमुळे ही ट्रिप अर्धवट सोडावी लागली होती. सर्वांना मुंबईला परत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. 
 

Web Title: sushant singh rajput friend reveals how he wept like a child after his split from sara ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.