Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसिंग राजपूत अन् क्रिती सॅननच्या रिलेशनशिपचा हा घ्या पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 22:23 IST

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांमधील वाढती जवळीकता सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यांच्या आगामी ‘राब्ता’ या ...

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांमधील वाढती जवळीकता सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यामध्ये क्रिती आणि सुशांतची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्यातील आॅफस्क्रीन केमिस्ट्रीही त्यांच्या फॅन्समध्ये रंगताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हे दोघे बºयाचवेळा एकत्र क्वॉलिटी टाइम एन्जॉय करताना स्पॉट झाले आहेत. दोघांमधील हावभाव पाहता ते रिलेशनशिपमध्ये असावेत, असेच काहीसे अंदाज सध्या बांधले जात आहेत. मात्र या चर्चा दोघांनीही फेटाळून लावल्या असून, या निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण काहीही असो सुशांत आणि क्रिती यांच्यातील बॉडी लॅँग्वेज आणि केमिस्ट्री ‘राब्ता’ची पकड मजबूत करणारी ठरत आहे. सध्या हे दोघेही ‘राब्ता’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, दोघेही एकमेकांशी खूपच जवळ असल्याचे दाखवून देत आहेत. सध्या असाच एक ‘राब्ता’चा स्टील सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा दोघांमधील रिलेशनशिपचा पुरावाच समजला जात आहे. या फोटोमध्ये सुशांत आणि क्रिती कॅँडिड पोजमध्ये बघावयास मिळत असून, हा फोटो त्यांच्यातील रोमान्स स्पष्टपणे दाखवून देतो. फोटोमध्ये दोघांची जोडी खूपच रिफ्रेशिंग आणि ऊर्जापूर्ण दिसत आहे. तसेच चित्रपटात दोघांच्या प्रेमाची कथा खूपच गोड असेल यात शंका नाही.दरम्यान, आतापर्यंतच्या ‘राब्ता’च्या निर्मात्यांची पॉलिसी लक्षात घेता, त्यांनी एका गोष्टीकडे विशेष करून लक्ष दिले आहे, ते म्हणजे प्रेक्षकांमध्ये उत्साह कायम ठेवणे. या चित्रपटातील आणखी एक भूमिका ही सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे राजकुमार राव याची ३२४ वर्षांच्या म्हाताºयाची भूमिका होय. शिवाय टायटल ट्रॅकमध्ये दीपिकाचे ठुमकेही सध्या चर्चेत आहे. एकूणच फुल मसाला मुव्ही म्हणून ‘राब्ता’कडे बघितले जात आहे.