Join us

ब्रेक नाही ब्रेकअपचं! क्रिती सॅनन व सुशांत सिंग राजपूतचे ब्रेकअप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 19:34 IST

क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या अफेअरची चर्चा फार जुनी नाहीच. ही चर्चा अगदीच ताजी असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, हे अफेअर तुटल्याची नवी चर्चा सध्या जोरात आहे.

क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या अफेअरची चर्चा फार जुनी नाहीच. ही चर्चा अगदीच ताजी असताना, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, हे अफेअर तुटल्याची नवी चर्चा सध्या जोरात आहे.पिंकविलाने दिलेल्या बातमीनुसार, क्रिती व सुशांत यांचे ब्रेकअप झाले आहे. क्रितीला आता या रिलेशनशिपमध्ये जराही इंटरेस्ट उरलेला नाही आणि तिने हे रिलेशन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.खरे तर क्रिती व सुशांतने आपल्या रिलेशनशिपमधून तूर्तास ब्रेक घेतल्याचे कानावर आले होते. पण आता दोघांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहे. तूर्तास सुशांत ‘क्रिजी और मनी’च्या शूटींगमध्ये तर क्रितीने ‘लुकाछिपी’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.  'लुका-छिपी'चे शूटिंग ग्वालियर, मथुरा आणि आग्रामध्ये होणार आहे. यात कार्तिक एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. बुडापेस्ट येथे  राबताच्या शूटींगदरम्यान सुशांत व क्रिती जवळ आले होते. यानंतर एकमेकांच्या ताटात जेवनापासून तर शूटींगनंतर एकमेकांसोबत खासगी क्षण घालवण्यापर्यंत सुशांत व क्रिती परस्परांत गुंतले होते आणि दुसरीकडे सुशांत व अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. सुशांत व अंकिता दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. पण क्रिती आली आणि सुशांतला अंकिता दुरावली. कदाचित आता कायमची दुरावली. 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत