Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'मध्ये सुशांत सिंह राजपूत रामाच्या भूमिकेत असता तर? Ai फोटो पाहून रणबीरलाही विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:28 IST

नितेश तिवारींच्या या 'रामायण'मध्ये दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रामाच्या भूमिकेत असता तर? प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये सुशांत कसा दिसला असता? याचे Ai फोटो व्हायरल झाले आहेत.

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच समोर आली. रामच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरला पाहून चाहते थक्क झाले. मात्र नितेश तिवारींच्या या 'रामायण'मध्ये दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रामाच्या भूमिकेत असता तर? प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये सुशांत कसा दिसला असता? याचे Ai फोटो व्हायरल झाले आहेत. सुशांतच्या बहिणीने तिच्या सोशल मीडियावरुन अभिनेत्याचे प्रभू श्रीरामाच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 

सुशांतची बहीण श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये 'रामायण'मधील काही सीन्समध्ये रणबीर कपूरऐवजी Aiच्या मदतीने सुशांत सिंह राजपूतला एडिट केल्याचं दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत सुशांतच्या बहिणीने पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, "सुशांतला रामाच्या भूमिकेत पाहिल्यावर इतक्या भावना का जागृत होतात? कारण प्रभू राम हे फक्त एक व्यक्ती किंवा पात्र नाहीत. तर ते ज्या मूल्यांचे प्रतीक आहेत म्हणजे मर्यादा, करुणा, सन्मान, धैर्य, सत्य आणि सीतेवरील त्यांचे प्रेम..तीच मूल्ये  आपणही जपतो".

"वडिलांनी दिलेल्या वचनासाठी प्रभू रामांनी आपल्या पत्नीला दिलेल्या शब्दाचा मान राखत सर्व सांसारिक सुखांचा त्याग केला आणि वनवास स्वीकारला. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपण या महान व्यक्तिमत्त्वांच्या मूल्यांची पूजा करतो आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा व ताकद घेतो. सुशांत रामाच्या भूमिकेत आपल्याला भावतो, कारण तो फक्त दिव्य आणि सुंदर दिसत नाही, तर तो प्रभू रामांच्या व्यक्तिमत्त्वातील ताकद आणि चारित्र्यही जिवंत करतो. त्याच्या डोळ्यांतील निरागसता आणि शुद्धता, चेहऱ्यावरची उदात्तता हे दाखवते की आजच्या काळात रामाची भूमिका इतक्या सुंदरपणे कोणीही साकारू शकणार नाही, जशी सुशांतने साकारली असती", असंही तिने पुढे म्हटलं आहे. 

सुशांतला प्रभू रामाच्या लूकमध्ये पाहून चाहतेही खूश झाले आहेत. रामायणमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीतामाता, अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकयी, रवी दुबे, लक्ष्मण, यश रावण, सनी देओल हनुमान या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात आदिनाथ कोठारे, अजिंक्य देव हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sushant Singh Rajput as Ram in Ramayan? Fans prefer AI look.

Web Summary : AI imagines Sushant Singh Rajput as Lord Ram in Nitesh Tiwari's 'Ramayan'. Sushant's sister shared the images, evoking strong emotions. Fans feel Sushant embodies Ram's values and purity better than Ranbir Kapoor.
टॅग्स :रामायण सिनेमासुशांत सिंग रजपूतरणबीर कपूर