Join us  

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल 

By रूपाली मुधोळकर | Published: September 24, 2020 11:32 AM

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणात दीपिकाचे नाव येताच रणवीर सिंग ट्रोल होतोय.

ठळक मुद्देएनसीबीच्या तपासादरम्यान D N S K असा कोड समोर आहे. त्यामुळे एनसीबी त्या दिशेने आपला तपास केला.

ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावला आहे़ सोशल मीडियावर याचे पडसाद उमटणार नाहीत तर नवल. सध्या सोशल मीडियावर यावरच्या मीम्सचा जणू पाऊस पडतोय. विशेषत: दीपिका पादुकोणचा पती रणवीर सिंग याला जबरदस्त ट्रोल केले जात आहे. त्याच्यावरचे एक ना अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.ड्रग्ज कनेक्शनप्रकरणात दीपिकाचे नाव येताच रणवीर सिंग ट्रोल होतोय. पण नेटक-यांचा खरा राग दीपिकावर आहे. कारण  सुशांत सिंग राजपूत डिप्रेशनमध्ये होता, असा दावा दीपिकाने केला होता. सुशांतबद्दलची तिची ही डिप्रेशनची थ्योरी अनेकांना आवडली नव्हती. आता दीपिका ड्रग्ज प्रकरणात फसल्यानंतर नेटकरी त्यावरून तिला लक्ष्य करत आहेत. उद्या 25 सप्टेंबरला दीपिका चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार आहे.

रणवीर असा झाला ट्रोलदीपिकाच्या ड्रग्ज कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर काही नेटक-यांनी रणवीर सिंगच्या ड्रेसिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थित केले आहेत तर काहींनी दीपिकाच्या डिप्रेशन थ्योरीवरून रणवीरची मजा घेतली आहे. ‘ड्रग्ज ने बना दी जोडी’ असे एका युजरने लिहिले. रणवीरने दीपिकाकडून ड्रग्ज घेण्याचे ट्रेनिंग घेतले, असे अनेक मीम्स शेअर करत युजर्सनी रणवीरला ट्रोल केले. यापैकी काही मीम्स तुम्ही खाली पाहू शकता...

अशी अडकली दीपिका एनसीबीच्या जाळ्यातएनसीबीच्या तपासादरम्यान D N S K असा कोड समोर आहे. त्यामुळे एनसीबी त्या दिशेने आपला तपास केला.D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहे. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे.ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचे नावही समोर आले आहे. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केले होते़ सध्या अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात साराच्या नावाचा खुलासा केला होता. केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूवीर्ही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते़, असे तिने सांगितले होते. यानंतर सारा एनसीबीच्या रडारवर आली. याशिवाय श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांनाही एनसीबीने समन्स जारी केला आहे.

ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

टॉप बॉलिवूड अभिनेत्रींना NCB कडून समन, कंगना म्हणाली - त्यांना पश्चाताप होत असेल....

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण