सुशांत-अंकिताच्या ‘गुपचूप’ भेटी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 10:50 IST
‘पवित्र रिश्ता’ मधून ज्यांचं प्रेम फुललं, बहरलं आणि एका नात्यात बांधलं गेलं असं सुशांत-अंकिताचं प्रेम....ते डिसेंबर मध्ये लग्न करणार ...
सुशांत-अंकिताच्या ‘गुपचूप’ भेटी ?
‘पवित्र रिश्ता’ मधून ज्यांचं प्रेम फुललं, बहरलं आणि एका नात्यात बांधलं गेलं असं सुशांत-अंकिताचं प्रेम....ते डिसेंबर मध्ये लग्न करणार होते. पण, मध्यंतरी झालेल्या गैरसमजुतींमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर चाहते आणि हितचिंतक सर्वजण परेशान झाले. ते पुन्हा एकत्र कसे येतात याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले.आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की, ते दोघे आता पुन्हा एकत्र येण्याच्या विचारात आहेत. गुपचूप एकमेकांना भेटत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे कळालेय की, सुशांत त्याच्या बिझी शेडयूलमधून वेळ काढून तिच्यासोबत टाईम स्पेन्ड कररत आहे.अद्याप ही अफवाच समजली जात असून दोघांना एकत्र पाहण्यात आलेले नाही. वेल, आपल्याला तर ते दोघे एकत्र येणेच जास्त आवडेल. नाही का?