Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल संपले आता ‘सूर्यवंशम’चा धडाका; पण हा चित्रपट वारंवार का दाखविला जातो? जाणून घ्या त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 14:59 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सूर्यवंशम’ या चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन यांचा ट्रक चालवितानाचा फोटो व्हायरल होत आहे. या ...

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सूर्यवंशम’ या चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन यांचा ट्रक चालवितानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत ‘आता आयपीएल संपले; हिरा ठाकूर परतीच्या मार्गावर’ अशा ओळीही लिहिल्या जात आहेत. अर्थात हा नेटिझन्सनी तयार केलेला जोक आहे. परंतु बºयाच लोकांना हा प्रश्न सतावत आहे की, अखेर एका विशिष्ट चॅनेलवरच हा चित्रपट वारंवार का दाखविला जात आहे. याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे सागण्या अगोदर ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये अमिताभ बच्चन हिरा ठाकूरच्या भूमिकेत आहेत. अमिताभ यांचा या चित्रपटात डबल रोल दाखविण्यात आला आहे. खरं तर ही माहिती तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कारण बºयाचशा प्रेक्षकांना या चित्रपटातील पात्र, कथा आणि डायलॉग मुखपाठ झालेले आहेत. हिरा ठाकूर, गौरी, मेजर रंजित हे पात्र प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. अर्थात प्रेक्षकांवर या चित्रपटाचा माराच एवढ्या प्रमाणात केलेला आहे की, त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट मुखपाठ झाला आहे.  त्यातच सोशल मीडियाचे जग असल्याने या चित्रपटावरून जोक तयार होणार नाहीत, असे म्हणणे घाईचेच ठरेल. याचा अर्थ चित्रपटात काही दोष आहे, असे अजिबात नाही. केवळ हा चित्रपट वारंवार दाखविला जात असल्याच्या एकाच कारणाने यावर जोक तयार केले जात आहेत. असो, आता आम्ही हा चित्रपट का वारंवार दाखविला जातो याचे कारण तुम्हाला सांगणार आहोत. सेट मॅक्स म्हणजेच आताचे सोनी मॅक्स या चॅनेलवर हा चित्रपट हमखास बघावयास मिळतो. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सोनी मॅक्सने ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाचे अधिकार तब्बल शंभर वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळे या चॅनेलवर हा सिनेमा वारंवार दाखविला जात आहे. आणखी दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हा सिनेमा १९९९ मध्ये आला होता, त्याच दरम्यान हे चॅनेलही लॉन्च करण्यात आले होते. या एकाच कारणामुळे हा चित्रपट वारंवार दाखविला जात आहे. हे उत्तर वाचून अनेक प्रेक्षकांच्या मनातील शंकेचे निरसन होईल, यात शंका नाही.