Join us
Daily Top 2Weekly Top 5

आली लहर, मुंबईत येताच सनी लिओनीने केला कहर, अवतार पाहून ओळखणं झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 15:22 IST

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबईत परतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सहा महिन्यांनंतर मुंबईत परतली आहे. कोरोनाचे संक्रमण सुरू होता सनीने लॉस एंजेलिसला गेली होती. सनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सहा महिन्यांनी मुंबईत परतल्याचे सांगितले आहे. सनीने हा अनुभव एडव्हेंचरस असल्याचे सांगितले.  

सनी लिओनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत लॉस एंजेलिसमध्ये होती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सनीने म्हटले होते की, ती मुंबईत आपल्या घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहतेय. जेव्हा तिला मुंबईला कधी येणार असे विचारले तेव्हा सनी म्हणाली की आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होताच आणि परिस्थिती थोडी सुधारली की ती परतले. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी लिओनी लवकरच 'एमएक्स प्लेयर' वरील 'बुलेट्स'मध्ये करिश्मा तन्नासमवेत दिसणार आहे. सध्या सनी मुलांची विशेष काळजी घेते आहे.  लॉकडाऊन दरम्यान सनी सोशल मीडियार खूपच सक्रिय होती. लॉस एंजेलिसमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात होती. जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती

टॅग्स :सनी लिओनी