Join us

Video : स्विमसूट घालून पूलमध्ये सनी लिओनी करतेय मस्ती, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:28 IST

सनीचा हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होतो आहे.

सनी लिओनी आपल्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. सध्या सनी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे हॉट फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा सनी तिच्या अशाच  एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सनी लिओनीने तिच्या सोशल अकाऊंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होते आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिऑन स्विमिंग सूट घालून स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसतेय. या व्हिडीओत सनी मस्तीच्या मूडमध्ये दिसते आहे. तसेच सनीसोबत तिची मैत्रिणसुद्धा या व्हिडीओत दिसतेय. सनीने या व्हिडीओला कॅप्शनसुद्धा दिले आहे. यात ती लिहिते,''माझ्या मैत्रिणीसोबत मस्ती..मस्ती...मस्ती..'' 

सनीचे फॅन्स तिचा हा व्हिडीओ बघून क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. सध्या लॉस एंजिलिसमध्ये ती आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसणार आहे. सनीला पुन्हा भारतातही परतायचे असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं होते. मात्र सनीवर तिचे चाहते प्रचंड टीका आणि संतप्त झाले होते.

टॅग्स :सनी लिओनी