ALSO READ : जस्टिन बीबरची ‘ही’ सवय तुम्हाला आश्चर्यचकित करेल!!सनी लिओनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सनी सर्वप्रथम जस्टीनचे भारतात येण्यासाठी स्वागत करते आणि मग तुला एक सल्ला द्यायचाय, असे सांगत एक गोड मागणी करताना दिसते. ‘बीबर मी सनी लिओनी, भारतात तुझे स्वागत करते. मला तुला एक सल्लाही द्यायचाय. तू स्टेजवर परफॉर्मन्स करशील तेव्हा, मी सांगितलेली ही स्टेप नक्की कर’, अशी गळ ती घालते. केवळ एवढेच नाही तर ही स्टेप करूनही दाखवते. येत्या १० मे रोजी जस्टीन बीबर भारत दौºयावर येतोय. त्याच्या भारत दौºयाची जोरदार तयारी सुरु आहे. जस्टिनसाठी दोन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये १३ रुम बुक करण्यात आल्या आहेत. ाांढरे शुभ्र पडदे आणि काचेचा फ्रीज अशा थाटात त्याच्या रूम सजवण्यात आल्या आहेत. त्याच्या फ्रिजमध्ये पाण्याच्या २४ , एनर्जी ड्रिंकच्या चार तर व्हिटॅमिन वॉटरच्या सहा बाटल्या असणार आहेत. याशिवाय विविध फळांचा रस आणि क्रिम सोडाही असणार आहे. खाण्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा समावेश आहे. त्याच्या या शोच्या तिकिट खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. या शोचे कमीत कमी तिकीट ५०४० रुपये आहे, तर प्लॅटिनम तिकीट १५४०० रूपयांपर्यंत असल्याचे कळतेय. विशेष म्हणजे ही तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचंही बोलले जात आहे.Hey @justinbieber , @SunnyLeone has a message for u #PurposeTourIndiapic.twitter.com/cEgELG5nEK— POP Diaries (@Popdiarieslive) 30 April 2017
सनी लिओनीने जस्टीन बीबरकडे केली ‘ही’ गोड मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 12:07 IST
जस्टीन बीबरच्या भारत दौ-याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच बॉलिवूडची हॉट अॅण्ड ब्युटिफुल ग्लॅमडॉल सनी लिओनी हिने बीबरकडे एक वेगळीच ...
सनी लिओनीने जस्टीन बीबरकडे केली ‘ही’ गोड मागणी!
जस्टीन बीबरच्या भारत दौ-याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच बॉलिवूडची हॉट अॅण्ड ब्युटिफुल ग्लॅमडॉल सनी लिओनी हिने बीबरकडे एक वेगळीच मागणी केली आहे. आता ही मागणी काय, हे ऐकायला तुम्ही उत्सुक असाल. तर तुम्हाला बातमीसोबत आम्ही दिलेला सनीचा व्हिडिओ पाहावा लागेल.