Join us

सनी लिओनीचा मुलगा असं काही बोलला की जे ऐकताच तिच्या डोळ्यात टचकन आलं पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:17 IST

सनी लिओनी बर्‍याचदा आपल्या मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री सनी लिओनी नुकतेच आपल्या मुलावर बनवलेल्या इमोशनल पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलगा अशरचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने अशकशी झालेल्या संपूर्ण संभाषणा सांगितले आहे. यामध्ये सनीने असे म्हटले आहे की, मुलाने आपल्या एका प्रश्नावर असे उत्तर दिले की हे ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यांत अश्रू आले.

सनी लिओनीने आपला मुलगा अशरचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका बागेत बसलेला दिसतौ आहे. या  फोटोसोबत तिने अशरसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे, हे ऐकून सनी इमोशनल झाली. सनी लिहितो की- मी विचारले, तुला इतके सुंदर कोणी बनवले आहे? मुलगा म्हणाला- तू बनवले आहेस आई.. सनी म्हणतो की माझ्या मुलाचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. 

सनी लिओनी बर्‍याचदा आपल्या मुलांसोबत फोटो पोस्ट करते. लॉकडाऊन दरम्यान, त्याने कुटुंबसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट केले. आपल्या बिझी शेड्यूलमधून  वेल काढून सनी मुलांसोबत मजा मस्ती करताना दिसते. सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. सनी लिओनी आपल्या बोल्ड अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे.  

टॅग्स :सनी लिओनी