Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनीला घाई झालीय लॉकडाउन संपण्याची, बिकनीतील हॉट फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 11:34 IST

अभिनेत्री सनी लिओनीदेखील लॉकडाऊन संपण्याची  वाट पाहत आहे.

देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याआधी 14 तारखेला लॉकडाऊन संपेल अशी ज्यांना आशा होती, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन संपण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. बरेच कलाकार देखील बाहेरच्या जगातील आयुष्य मिस करत आहेत. त्यामुळे लॉकडाउन वाढल्याचे समजताच तेदेखील थोडे निराश झाले आहेत. असेच काहीसे बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीसोबत झाले आहे.

अभिनेत्री सनी लिओनीदेखील लॉकडाऊन संपण्याची  वाट पाहत आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की, '4 मेचं स्वप्न पाहताना...' सनीनी  निळ्या रंगाच्या बिकीनीमधला हा हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

सनी लिओनी क्वारंटाइन दिवस एन्जॉय करताना काही जुने बोल्ड फोटो देखील शेअर करत आहे.

आयटम गर्ल बनण्याआधी सनी ही पॉर्न स्टार म्हणूनच जास्त फेमस होती. भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे. त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते.

आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. सनीने नंतर डॅनिअलशी लग्न करत तिच्या आयुष्याला नवीन सुरूवात केली.

सनी आणि डॅनिअलच्या लग्नाला आता १२ वर्ष झाली आहेत. सनी आणि डॅनिअल यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री आहे. सनी आता संसारात रमली आहे. तिला तीन मुलं देखील आहेत.

टॅग्स :सनी लिओनी