सनीच्या या कजिनचे नाव दीपा नामा आहे. दीपा ही कॅनडाच्या ब्रॅम्पटन सिटीत राहते. सोमवारी दीपा लग्नबंधनात अडकली. सनीने हे लग्न जाम एन्जॉय केले. या लग्नाबद्दल सनी कमालीची एक्ससाईटेड होती. मी लहानपणापासून माझे अंकल आणि कजिनसोबत क्लोज होते. आम्ही दोघींनी खूप चांगले दिवस एकत्र घालवलेत. तिच्या लग्नात सामील होण्याची संधी मी मिस करू इच्छित नाही. हे तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि या सरप्राईजनंतरचा तिच्या चेह-यावरचा आनंद टीपण्यास मी कमालीची उत्सूक आहे, असे कॅनडाला रवाना होण्यापूर्वीच सनीने म्हटले होते. सनी म्हणाली त्याप्रमाणे तिच्या बहिणीच्या चेह-यावरचा आनंद फोटोंमध्ये स्पष्ट दिसतोय.
सनीने या लग्नातील काही व्हिडिओही अपलोड केले आहेत. यात ती फन मोमेंट एन्जॉय करताना दिसतेय. बहिणीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सनीने अर्चना कोचरने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली.
यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते, हे सांगणे नकोच. या फोटोत सनीचा लाडक हबी डेनिअल वेबर कुठेच नाही. कारण डेनिअलला मुंबईत आहे. होय, मुलगी निशाच्या देखरेखीसाठी डेनिअल मुंबईतच थांबला आणि सनी एकटी कॅनडाला गेली.
ALSO READ: सनी लिओनीसोबत कंडोमची जाहिरात करण्यासाठी ईशा गुप्ताची डिमांड ऐकून चकित झाले कंपनीवाले!
सनी लवकरच अरबाज खानसोबत ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती असल्याचे सांगितले जाते. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी कथा यात पाहायला मिळणार आहे.