Join us

शेकडोंच्या गर्दीसमोर सनी लिओनीने मागितली ‘सनी’ची माफी, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 16:03 IST

होय, चक्क शेकडो लोकांच्या साक्षीने सनी लिओनीने ‘सनी’ची माफी मागितली.

ठळक मुद्दे सनीने माफी मागताच सनी देओलकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या.

सनी हे नाव घेतले की, बॉलिवूड प्रेमींना दोन चेहरे हमखास आठवतील. एक म्हणजे, सनी देओल आणि दुसरे म्हणजे सनी लिओनी. नावाचे साधर्म्य आणि व्यवसायक्षेत्र सोडले तर दोघांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण असे असताना सनी लिओनीनेसनी देओलची माफी मागितली आहे. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे. होय, चक्क शेकडो लोकांच्या साक्षीने सनी लिओनीने सनी देओलची माफी मागितली. आता का तर पुढची बातमी वाचा.

तर त्याचे झाले असे की, सिंगापूर येथे नुकताच आंतरराष्ट्रीय भोजपुरी अवार्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यांला बॉलिवूडच्याही अनेकांनी हजेरी लावली. सनी लिओनी त्यापैकीच एक़ यादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यासाठी सनीच्या नावाचा पुकारा झाला. सनी पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंचावर आली आणि येथेच तिने सर्वांच्या साक्षीने सनी देओलची माफी मांगितली.

‘ सनी देओल, कृपया मला माफ कर. माझे आणि तुझे नाव सारखेच आहे, त्यामुळे अनेकदा माझ्यामुळे तुझ्यावर ट्रोल होण्याची वेळ येते. अनेकदा नेटकरी सनी या नावाने मीम्स व्हायरल करतात. ज्यामुळे तुला नाहक त्रास होतो. प्लीज मला माफ करा’, अशा शब्दांत तिने सनी देओलची माफी मागितली.

विशेष म्हणजे, यावेळी सनी देओल खुद्द उपस्थितांमध्ये बसलेला होता. सनीने माफी मागताच सनी देओलकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या. सनी बिचारा काय बोलणार? काहीच न बोलता तो नुसता हसला. आता हा गमतीदार प्रसंग पाहू उपस्थितांमध्ये हसू पसरले नसेल तर नवल.

 

टॅग्स :सनी लिओनीसनी देओल