सनीप्रमाणेच सनीचा पती डेनियल वेबर हा सुद्धा अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत स्टार राहुन चुकला आहे. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. यानंतर दोघांनीही पॉर्न इंडस्ट्रीला राम राम ठोकला. सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तर डेनियल तिचा बिझनेस मॅनेजर बनला. त्यामुळेच सनी बॉलिवूडमधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पती डेनियलला देते. डेनियलच्या परवानगीशिवाय सनी कुठलाही चित्रपट साईन करत नाही.
ALSO READ : सनी लिओनीने असा घेतला मस्करीचा बदला! हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाचं हवा!!
सनी व डेनियल सर्वप्रथम लॉस वेगासच्या एका रेस्टारंटमध्ये भेटले. डेनियल तिथे आपल्या बँडसोबत शो करण्यासाठी आला होता तर सनी आपल्या मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी तिथे पोहोचली होती. सनीला पाहताच डेनियल तिच्या प्रेमात पडला. सनी रेस्टारंटमध्ये बसली होती. मग काय, डेनियल तिच्या टेबलापाशी गेला आणि तिचे नाव विचारून परतला. यानंतर सनी त्या रेस्टारंटमध्ये पोहोचली की, एक फुलांचा गुच्छ तिला मिळायचा. अर्थातच हा पुष्पगुच्छ डेनियलने पाठवलेला असायचा. अशी दोघांची प्रेमकथा बहरली आणि पुढे डेनियल व सनीने लग्नाचा निर्णय घेतला.