Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:28 IST

'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारण्याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने भाष्य केलं आहे.

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्री राम तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण' सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही समोर आले होते. या सिनेमाची कास्टही समोर आली आहे. त्यानुसार अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारण्याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने भाष्य केलं आहे. 

सनी देओलने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "हो मी भूमिका साकारत आहे. हे रोमांचक आणि मजेशीर असेल. मी लवकरच सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे. मी 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगसाठी थोडा नर्व्हस आहे. मला भीती वाटतेय, जी की नेहमीच असते. पण, हेच याचं सौंदर्य आहे. कारण, यासाठी तुम्हाला स्वत:ला तयार करावं लागतं".

"निर्माता खूप चांगलं काम करत आहेत. कारण, ते अलौकिक असं काहीतरी स्क्रीनवर दाखवण्याची तयारी करत आहेत. मला आशा आहे की हा सिनेमा हॉलिवूडपेक्षा कमी नसेल. 'रामायण'वर अनेक प्रोजेक्ट बनले आहेत. पण, ज्याप्रकारे हा सिनेमा बनत आहे आणि जसे कलाकार आहेत. मला विश्वास आहे की आम्ही याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि प्रेक्षकांनाही सिनेमा आवडेल", असं सनी देओल म्हणाला. 

दरम्यान नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचं बजेट ८३५ कोटी इतकं आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये बनवला जाणार आहे. सिनेमाचा पहिला भाग २०२६मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 'रामायण'मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश, लारा दत्ता, आदिनाथ कोठारे हे कलाकार दिसणार आहेत. 

टॅग्स :सनी देओलरामायणरणबीर कपूर