Join us  

'गदर' सिनेमाच्या विरोधात होती फिल्मइंडस्ट्री, सनी देओलने सांगितलं कारण; म्हणाला, 'पंजाबी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 1:51 PM

जेव्हा फिल्म रिलीज झाली होती तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येकजण साथ सोडत होता कारण...

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या आगामी 'गदर 2' (Gadar 2) मुळे चर्चेत आहे. यामध्ये तो पुन्हा 'तारा सिंग'च्या भूमिकेत अॅक्शन करताना दिसणार आहे. तसंच तारा सिंग आणि सकीनाची जोडीही बऱ्याच वर्षांनी पडद्यावर बघायला मिळणार आहे. सनी देओल (Sunny Deol)आणि अमिषा पटेलने (Amisha Patel)  नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान 'गदर'च्या दिवसांची आठवण काढताना सनी देओलने मोठा खुलासा केला.

कपिल शर्मा या लोकप्रिय शोमध्ये सनी देओल 'गदर 2' च्या प्रमोशनसाठी आला आहे. यावेळी कपिलने त्याला रिलीज आधीच्या भावना कशा आहेत याबद्दल विचारले असता सनी देओल म्हणाला, 'खूप उत्साह आहे. पण थोडी भीतीही आहे. जेव्हा फिल्म रिलीज झाली होती तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येकजण साथ सोडत होता. मात्र ज्याप्रकारे प्रेक्षकांनी सिनेमाला सावरुन घेतलं आणि सगळे लोकही बदलले.'

'गदर' नुकताच ९ जून रोजी पुन्हा रिलीज करण्यात आला होता. याहीवेळी प्रेक्षकांनी सिनेमा तुफान प्रतिसाद दिला. सनीने एका कार्यक्रमात गदरच्या आठवणी ताज्या केल्या होत्या. तो म्हणाला होता की,'सिनेमाच्या रिलीजवेळी अनेकांनी मला डब करण्याचा सल्ला दिला होता. कारण सिनेमा अनेक संवाद हे पंजाबीमध्ये होते. 'गदर' ला पंजाबी फिल्म असल्याचं सांगत बॉलिवूडने स्वीकारलं नाही.'

तो पुढे म्हणाला,'जेव्हा गदर रिलीज झाला तेव्हा हे नव्हतं माहित की फिल्म सिनेमागृहात गदर करेल. अनेक वितरकांनी ही पंजाबी फिल्म आहे असं सांगत खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. मात्र प्रेक्षकांना सिनेमा आवडला आणि त्यांनी सर्वांची बोलती बंद केली. प्रेक्षकांनीच आम्हाला गदर २ बनवण्याची हिंमत दिली.'

'गदर 2' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांची महत्वाची भूमिका आहे. गदर प्रमाणेच गदर २ ही सुपरहिट ठरेल अशी आशा आहे.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूड