Join us

खासदार झाल्यानंतरही अभिनयाकडे वळला बॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 14:20 IST

या सिनेमाचे शूटिंग त्यांनी मुंबईत सुरु केले आहे.

खासदार बनल्यानंतर सनी देओल पुन्हा एकदा अभिनयाकडे वळला आहे. सनी देओल हे शेवटचा ब्लॅक सिनेमात दिसला होता. डिजीटल मीडियाची वाढती लोकप्रियता बघून सनी यांनी डिजीटल मीडियावर डेब्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बॉलिवूड हगामाच्या रिपोर्टनुसार सनी zee प्रॉडक्शनच्या सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग त्यांनी मुंबईत सुरु केले आहे. या शोचे नाव असले G 49 असेल. यात सनी अॅक्शन करताना दिसतील.  या शो बाबतची अधिक माहिती अजून मिळालेली नाही.  

सिनेमा यश मिळाल्यानंतर सनी देओल यांनी राजकारणात प्रवेश केला. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना 80 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले होते. सनी यांचा मुलगा करण देओलने देखील बॉलिवूडमध्ये 'पल पल दिल के पास' या सिनेमातून डेब्यू केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सनी देओल यांनीच केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र चाहत्यांनी नव्या देओलचं मोठ्या मनानं स्वागत केलं होतं.

टॅग्स :सनी देओल