Join us

‘परी’ बनणार सुनील शेट्टीची मुलगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 11:09 IST

 परिणीती चोप्रा हिने ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आह’ या गाण्यात तिचे वजन प्रचंड घटवलेले आपण पाहिले. परिणीतीने वजन घटवल्याने आता ...

 परिणीती चोप्रा हिने ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘जानेमन आह’ या गाण्यात तिचे वजन प्रचंड घटवलेले आपण पाहिले. परिणीतीने वजन घटवल्याने आता तिला अनेक प्रोजेक्ट्स मिळू लागले आहेत. पण, तिने काही काळ ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. ‘दबंग ३’ आणि ‘चमेली की शादी’ हे दोन चित्रपट ती करणार आहे.चमेली की शादी मध्ये ती दिलजीत दोसांझ सोबत दिसणार आहे. मात्र, तिने ‘सर्कस’ मधील महिलाधारित भूमिकेला होकार दिला आहे. हा चित्रपट कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांचा दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील डेब्यू आहे.बॉस्को-मार्टिस यांनी एकत्र मिळून ‘बँग बँग’,‘शानदार’,‘तमाशा’ आणि ‘दिल धडकने दो’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘सर्कस’ हा एक वडील-मुलीच्या नात्यावर आधारित चित्रपट असून यात सुनील शेट्टी वडील तर परिणीती ही मुलीची भूमिका साकारणार आहे.