Join us

‘साहो’ सिनेमाचा दिग्दर्शक सुजीत रेड्डी अडकला रेशीमगाठीत, लग्नाचे Inside फोटो आले समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 17:16 IST

 सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत रेड्डीने  गर्लफ्रेंड प्रवलिकासह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं आहे.  सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत रेड्डीने  गर्लफ्रेंड प्रवलिकासह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. प्रवालिका एक डेंटिस्ट आहे. ते दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  हे लग्न थोडं हटके होतं. लॉकडाऊन काळात अगदी ठराविक नातेवाईकाच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.   लग्नाच्या फोटोमध्ये सुजित पारंपारिक पांढर्‍या रंगाची धोती कुर्ता घाललेला दिसत आहे, तर प्रवलिका पिंक कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

या लग्न सोहळ्याचे फोटो समोर आले असून यांत नवदाम्पत्य भलतेच खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय दोघांचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच त्याने साखरपुडा झाल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती.

सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी हे कपल सोशल मीडियावर शेअर करताना दिसले होते. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया मित्र मंडळी आणि चाहते देत आहेत.

सुजीतने प्रभास व्यतिरिक्त, बॅालीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर, जैकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, टीनू आनंद, चंकी पांडे,अरुण विजय सारख्या कलाकारांसह काम केले आहे.  दिग्दर्शक म्हणून सुजित रेड्डीचा पहिला चित्रपट 'रन राजा रन' देखील सुपरहिट ठरला होता. हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट होता ज्यात अभिनेत्री सीरत कपूर आणि शारवानंद यांच्या भूमिका होत्या.