Join us  

'कभी हा कभी ना' फेम सुचित्रा कृष्णमूर्तीची इच्छा, सिनेमाच्या रिमेकवर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 1:07 PM

सिनेमाच्या रिमेकबाबतीत बोलताना सुचित्राने एक इच्छा व्यक्त केली.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'कभी हा कभी ना' (Kabhi Haan Kabhi Naa) सिनेमा आठवतोय का? 1994 साली आलेला हा सिनेमा आजही चाहत्यांच्या आवडीचा आहे. यावर्षी फेब्रुवारीत सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली.'आना मेरे प्यार को ना तुम झुठा समझो जाना' हे गाणंही खूप गाजलं. सुचित्रा कृष्णमूर्ती सिनेमात अॅना ही मुख्य अभिनेत्री होती. आता सिनेमाच्या रिमेकची चर्चा आहे. या रिमेकबाबतीत बोलताना सुचित्राने एक इच्छा व्यक्त केली आहे. 

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने नुकतीच मुलाखत दिली. सिनेमाच्या रिमेकबाबतीत बोलताना सुचित्राने एक इच्छा व्यक्त केली. सुचित्राने सिनेमा अॅना ही भूमिका साकारली होती. तर या भूमिकेत तिची मुलगी कावेरीने काम करावं अशी इच्छा सुचित्राने व्यक्त केली आहे. तसंच तिने शाहरुखच्या भूमिकेवरही चर्चा केली. शाहरुखचा मुलगा आर्यन खानने ती भूमिका साकारावी असं ती म्हणाली. शाहरुखने यामध्ये सुनील हे पात्र साकारलं होतं ज्याचं अॅनावर सीक्रेट प्रेम असतं.

सुचित्राने 'कभी हा कभी ना' च्या रिमेकवर बऱ्याच मुलाखतींमध्ये चर्चा केली आहे. याआधी तिने सिनेमाच्या कास्टिंगसाठी वरुण धवन आणि आलिया भट यांचं मुख्य भूमिकेसाठी नाव घेतलं होतं. सुचित्रा शेवटची 'ब्रेव्हहार्ट' या टीव्ही सीरिजमध्ये दिसली होती. 'कभी हा कभी ना' मध्ये अभिनेता दीपक तिजोरीही मुख्य भूमिकेत होता. सुचित्राचा हा पहिलाच सिनेमा होता. यानंतर तिने काही टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड