Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिकीनी नाही तर टी-शर्ट घातल्यामुळे ट्रोल झाली दिशा पटानी, मिळतायेत अशा कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:00 IST

दिशाला ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही तिची खिल्ली उडवण्यात आली होती.

सध्या सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना  अनेक वेळा त्यांच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जातात. असेच काही आता दिशाबद्दलही झाल्याचे पाहायला मिळते. अधिक तर दिशा  तिच्या बोल्ड अंदाजातले फोटो शेअर करत पब्लिसिटी मिळवत असण्याचा प्रयत्न करते. नुकतेच चंदीगढ येथे एका कार्यक्रमासाठी दिशा जात होती. यावेळी तिने टी-शर्ट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर  नेटीझन्सने तिचा साधा अंदाज बघून तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. आज अचानक बिकीनी ऐवजी टी-शर्ट मध्ये दिशा दिसली म्हणून तिला ट्रोल करण्यात आले. दिशाला ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही तिची खिल्ली उडवण्यात आली होती. 

काही दिवसांपूर्वीच लहेंगावर तिने ब्लॉऊज घालण्याऐवजी स्पोटर्स ब्रा घातली होती. त्यामुळे नेटिझन्सने तिची चांगलीच खिल्ली उडवली होती. दिशा तू ब्लॉऊज घालायला विसरलीस का, तू यात खूपच वाईट दिसत आहेस..दिवाळीला तरी चांगले कपडे घालत जा, स्पोटर्स ब्राला ब्लाऊजसारखे कोण घालतं का, फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायला विसरलीस का यांसारख्या चित्रविचित्र प्रतिक्रिया दिशाच्या फॅन्सने तिच्या फोटोवर दिल्या होत्या.

'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं.

'बागी-२' सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :दिशा पाटनीभारत सिनेमा