पाच तरुणांबरोबर रिलेशनशिपमध्ये राहूनही ‘ही’ अभिनेत्री वयाच्या ४७व्या वर्षी जगते एकाकी जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 21:14 IST
अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री पूजा बेदी हिने खूपच ...
पाच तरुणांबरोबर रिलेशनशिपमध्ये राहूनही ‘ही’ अभिनेत्री वयाच्या ४७व्या वर्षी जगते एकाकी जीवन!
अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री पूजा बेदी हिने खूपच कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. चित्रपटात लाल रंगाचा ड्रेस परिधान करून मर्लिन मुनरोच्या अंदाजात दिलेली पोज आजही तिच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. मात्र अशातही पूजाला तिचे करिअर स्थिर करता आले नाही. अभिनयापेक्षा आपल्या फटकळ वक्तव्यांमुळे अन् पर्सनल लाइफमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे. त्यामुळे अजूनही ती तिच्या आयुष्यात स्थिर होऊ शकली नाही. ४७ वर्षीय पूजा तब्बल पाच पुरुषांबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिली, मात्र अशातही ती आज एकाकी जीवन जगत आहे. अभिनेता आदित्य पांचोली आणि पूजा बºयाच काळापासून चांगले मित्र होते. पुढे ते रिलेशनशिपमध्ये राहिले. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल आनंदी आणि समाधानी होते. परंतु त्यांच्या नात्यात त्यावेळी कटुता निर्माण झाली होती जेव्हा पूजाच्याच १५ वर्षीय मेडने सांगितले होते की, चित्रपटात भूमिका देण्याच्या विश्वासातून आदित्यने तिच्याशी सेक्शुअल रिलेशन ठेवले. त्यानंतर पूजा आदित्यसोबत कधीच बघावयास मिळाली नाही. पुढे आदित्यदेखील त्याची पत्नी जरिना वहाबकडे परतला. पुढे पूजा आणि फरहान एकमेकांच्या क्लोज आले. १९९४ मध्ये लग्न करण्याअगोदर या दोघांना जवळपास साडेतीन वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर पूजाने धर्मांतर केले. जेणेकरून तिच्या दोन्ही मुलांना आलिया आणि उमरला काही अडचणी उद्भवू नये. मात्र बारा वर्षांचा संसार केल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. २०१३ या वर्षी व्हॅलेंटाइन डेला या दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची आॅफिशियल अनाउंसमेंट केली. हनिफ आणि पूजा ‘नच बलिए-३’ या डान्स रिअॅलिटी शोदरम्यान जवळ आले. वास्तविक हनिफ पूजाचा डान्स कोरिओग्राफर होता. या दोघांनी एकमेकांना काही काळ डेट केले. पुढे २००८ मध्ये त्याच्यासोबतचेही नाते संपुष्ठात आले. रिलेशनशिपमध्ये सातत्याने अपयश होणाºया पूजाने भुवनेश्वरच्या (उडिसा) द्विती विक्रमादित्य याला डेट केले. जो युनायटेड नेशन्स डेव्हलेपमेंट प्रोग्रामचा असोसिएट आहे. पूजाने तिचा ४०वा वाढदिवस द्विती आणि दोन मुलांसह गोवा येथे सेलिब्रेट केला होता. पुढे दोघांनी साखरपुडाही केला. मात्र परिवारातून नकाराचा सूर असल्याने दोघांना विभक्त व्हावे लागले. पूजा आणि आकाशदीप बिग बॉसच्या सीजन पाच दरम्यान जवळ आले होते. शो संपल्यानंतर दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले होते. आकाशदीपने तर त्याच्या बायसेफवर पूजाचे नावही गोंदले होते. ज्यातून दोघांमधील नाते पुढेही कायम राहणार असेच काहीसे वाटत होते. मात्र यांचेही नाते फार काळ टिकले नाही.