Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लियोनी प्रमाणेच हे स्टारदेखील होते पॉर्न स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 15:32 IST

सनी लियोनी ही सध्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटातील लैला में लैला... हे ...

सनी लियोनी ही सध्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रईस या चित्रपटातील लैला में लैला... हे गाणे तर खूप गाजत आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सनी लियोनी ही पूर्वी पोर्न स्टार होती. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले आणि तिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. सनी पूर्वी पॉर्न स्टार असली तरी आज तिने बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूड अथवा हॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश करण्याआधी कोणकोणते कलाकार सनीप्रमाणेच पॉर्न स्टार होते हे आपण जाणून घेऊया...प्रिया अंजली राय प्रियाचा जन्म दिल्लीत झाला असला तरी ती केवळ दोन वर्षांची असताना एका अमेरिकन जोडप्याने तिला दत्तक घेतले. वयाच्या 29व्या वर्षापासून तिने अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. सहा वर्षांच्या करियरनंतर तिने या इंडस्ट्रीमधून संन्यास घेतला. आयएसआयएसःकर्स ऑफ दी लेडी ममी या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.डेव्हिड डचोवनीडेव्हिड अमेरिकन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहे. द एक्स फाइल्स या चित्रपटात त्याने साकारलेल्या एफबीआय एजंटची भूमिका प्रचंड गाजली होती. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला द रेड शू डायरीज या सॉफ्ट पोर्न सिरिजच्या एका भागात काम केले होते. डेव्हिड सेक्स अॅडिक्ट बनला असल्याने त्यावर त्याला उपचारदेखील घ्यावे लागले होते. त्याला यासाठी अनेक दिवस रिहॅबमध्ये ठेवण्यात आले होते. सिल्वेस्टर स्टेलोनरॉकी सिरिजमुळे सिल्वेस्टर नावारूपाला आला. त्याने हॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अॅक्शन भूमिका साकारल्या आहेत. रेम्बो या चित्रपटात त्याने साकारलेला जॉन रेम्बो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सिल्वेस्टरने त्याच्या करियरच्या सुरुवातीला पार्टी अॅट किटी, स्टड्स आणि द इटेलियन स्टेलोन यांसारख्या अनेक अॅडल्ट चित्रपटात काम केले आहे. आर्नोल्ड श्र्वेजनेगरआर्नोल्ड एक अभिनेता असण्यासोबतच एक राजकीय नेता आहे. त्याने चित्रपटात काम करण्यासोबतच चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. तसेच तो प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि अॅक्टिव्हिटिस्ट आहे. 2003 ते 2011च्या दरम्यान तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर होता. आर्नोल्डने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी अनेक अॅडल्ट चित्रपटात काम केलेले असल्याचे म्हटले जाते. पण याविषयी कोणताही पुरावा मीडियाकडे नाहीये.जॅकी चैन हॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन स्टार जॅकी चैन हा पॉर्न स्टार होता असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे 1975ला प्रदर्शित झालेल्या ऑल इन फॅमिली या कॉमेडी अॅडल्ट चित्रपटात त्याने एक न्यूड सीन दिला आहे. तसेच शिंजूकू इन्सिडेंट या चित्रपटात त्याने एक सेक्स सीन दिला होता. जॅकी जैन आपल्या कॉमिक टायमिंग आणि आपल्या अॅक्शन दृश्यांसाठी ओळखला जातो. पॅरी रिवेसपॅरीने 90च्या दशकात द रेड शू डायरीज या सॉफ्ट पोर्न चित्रपटात काम केले होते. ती एक प्रसिद्ध नायिका आहे. अमेरिकन ड्रीम्स आणि द एक्स फाइल्स हे तिचे शो खूप गाजले आहेत. साशा ग्रेसाशा ग्रेला 2009 ते 2010च्या दरम्यान फिमेल पॉर्नस्टार ऑफ द इयर हा किताब मिळाला होता. साशा ही प्रसिद्ध अभिनेत्री, संगीतकार आणि मॉडेल आहे. आय मेट विथ यू, ओपन विंडो, द गर्लफ्रेंड एक्सपिरियन्स यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. मॅट लिब्लांकमॅट नव्वदच्या दशकातील रेड शू डायरीज या सॉफ्ट पोर्न मुव्हीमध्ये झळकला होता. तो एक प्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक आहे. टॉय गियर का त्याने होस्ट केलेला शो प्रचंड गाजला होता. हेलन मिरेन हेलनला काल या चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच द क्वीन या चित्रपटात तिने क्वीन एलिझाबेथची भूमिका साकारली होती. हेलन एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक अॅडल्ट चित्रपटात हेलनने न्यूड सीन दिले आहेत. कॅमरन डियाजकैमरनच्या द मास्क, माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग, चार्लीज अॅन्जल्स यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. कॅमरन ही एक अमेरिकन अभिनेत्री असून तिने बॅड टीचर या अॅडल्ट कॉमेडी चित्रपटातदेखील काम केले आहे. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक अॅडल्ट चित्रपटात काम केले असल्याचे म्हटले जाते.